मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदाची शपथ घेतल्यापासून जे घडले नाही ते आज घडले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कोरोना लसीकरण कामाबद्दल चांगले मत व्यक्त केले. तेही त्यांच्या पद्धतीनुसार आकडेवारीसह! अर्थात तसे मत केलेल्या ट्विटमध्येच त्यांनी वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली, असे म्हटले आहेच! टोमणे तर आहेच आहेत!!
मागील वर्षाच्या कोरोना चाचण्यांच्या तुलनेत यावर्षी दुपटीने चाचण्या होत आहेत. तसेच गेल्या दहा दिवासात जवळजवळ १,२६,९५० चाचण्या दररोज होत आहेत. याचीच दखल घेत देवेंद्र फडणवीस ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटमधील मजकूर जसा आहे तसा:
अधिकाधिक 90 हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस !
चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली.
(1/2)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2021
“अधिकाधिक 90 हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस !
चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली.”
गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत.
असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा!
येणार्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!
(2/2)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2021
“गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत.
असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा!
येणार्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!”
ठाकरे सरकारला सुबुद्धी सुचल्याचं म्हणतानाच त्यासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची वाट महाराष्ट्राला पाहावी लागली, असा एका ट्विमधील टोमणा कमी होता म्हणून की काय त्यांनी पुढे आता तरी हे सूत्र कायम ठेवा, राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे, असा सल्ला देत…”लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!” असा सल्ला देत लॉकडाऊनचा इशारा देणाऱ्या सत्तेतील नेत्यांना पुन्हा टोमणाच मारला आहे.