मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्याच्य राजकारणात खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या वगळता भाजपाच्या अन्य नेत्यांनी त्या पत्राचे स्वागतच केले आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे ते जास्त बोललेले नसले तरी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात व्यक्त केलेली भाजपाशी युतीची इच्छा ही शिवसेनेत अनेकांची इच्छा असू शकते, असे सूचक विधान केले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात उलट-सुलट चर्चांना ऊत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक आरोप सरनाईक यांनी केला आहे. भाजपाविरोधात असल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक त्रास दिला जात असल्याने तो थांबवण्यासाठी भाजपसोबत जुळवून घेण्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवलं आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री प्रतिक्रिया दिली आहे.
सरनाईकांची इच्छा ही अनेकांची इच्छा…
- प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच ही अनेकांची इच्छा असू शकते.
- पण तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे.
- आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय.
- जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत.
कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं!
- आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो. पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ.
- भाजप स्वबळावरच लढत आहे.
- कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं.
- कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं आहे.
- आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधिलकीतून आम्ही काम करत राहू.
प्रताप सरनाईक यांच्या पत्रात नेमकं काय? त्यांचा लेटरबॉम्ब नेमका कुणासाठी?
वाचा:
वाचा