Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, पश्चिम द्रुतगती महामार्गाचं अंशतः काँक्रीटीकरण

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Concreting of Western Expressway

मुक्तपीठ टीम

मुंबई – ठाणे आणि एकंदरीतच मुंबई महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए प्रदेशातील वाहतुकीला गती देण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे खास लक्ष देत आहेत. या परिसरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंगळवारी एमएमआरडीएच्या संचालक मंडळाच्या १५१ व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत इस्टर्न फ्री वेचा ठाण्यापर्यंत विस्तार, आनंदनगर-साकेत-खारेगाव एलिव्हेटेड रोड, साकेत-गायमुख बायपास रस्ता या महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे, कोपरी-पटणी खाडी पूल आणि खारेगाव बायपास या प्रकल्पांनाही तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून त्यांची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश देण्यात आले. सदैव वाहतूककोंडीने ग्रस्त असणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. त्याचा एक भाग काही भागात काँक्रीटीकरण करण्यालाही मंजुरी देण्यात आली.

 

ठाणे आणि एमएमआर प्रदेशाची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली असून वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्याची आवश्यकता असून गेली अनेक वर्षे मागणी होत असलेल्या साकेत-गायमुख बायपास रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून फ्री वेचा ठाण्यापर्यंत विस्तार होणार असून हाच एलिव्हेटेड रस्ता पुढे साकेत ते खारेगावपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे गायमुख ते मुंबईपर्यंत विना कोंडी वाहतुकीचा मार्ग खुला होणार आहे. त्याचप्रमाणे, कोपरी-पटणी खाडी पूल आणि खारेगाव बायपासमुळे कळवा, विटावा, खारेगाव येथील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.

 

‘सध्या इस्टर्न फ्री वे शिवाजी नगर येथे समाप्त होतो. मात्र, त्यानंतर ठाण्यापर्यंत येताना मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे छेडा नगर ते ठाण्यापर्यंत या फ्री वेचा विस्तार करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले होते. याच एलिव्हेटेड फ्री वेचा विस्तार ठाण्यात आनंदनगर ते साकेत-खारेगाव असा होणार असल्यामुळे ठाणे शहरातील मुख्य महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूककोंडी संपुष्टात येईल. तसेच, साकेत-गायमुख बायपासमुळे घोडबंदर मार्गे होणाऱ्या वाहतुकीलाही दिलासा मिळेल,’ असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

पश्चिम द्रुतगती महामार्गाचे काँक्रीटीकरण

सदैव वाहतूककोंडीने ग्रस्त असणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठीही एमएमआरडीएच्या माध्यमातून अनेक उपाययोजना हाती घेण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून काही भागात काँक्रीटीकरण करण्याचाही प्रस्ताव होता. त्यालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Concreting of Western ExpresswayFreewayMMRDAmuktpeethMumbai Metropolitan Development AuthoritythaneUrban Development Minister Eknath Shindeएमएमआरडीएठाणेनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेपश्चिम द्रुतगती महामार्गाचे काँक्रीटीकरणफ्री वेमुक्तपीठमुंबई महानगर विकास प्राधिकरण
Previous Post

नेत्यांची माणुसकी अनलिमिटेड, डॉ. कराडांनी विमानात जीव वाचवला, इतरही नेते नाहीत मागे!

Next Post

‘नॅशनल चिकन डे’निमित्त पुण्यात स्वस्त दरात चिकन विक्री

Next Post
chicken day

'नॅशनल चिकन डे'निमित्त पुण्यात स्वस्त दरात चिकन विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!