Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय स्वातंत्र्यलढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे १७ सप्टेंबरपर्यंत बीडमध्ये प्रदर्शन

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Indian Freedom Struggle Rare Photograph

मुक्तपीठ टीम

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अनमोल ठेवा चित्रस्वरूपात एकत्रित पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यलढ्याचे विविध टप्पे या प्रदर्शनातून उलघडत आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज केले.

 Indian Freedom Struggle Rare Photograph

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर कार्यालयातर्फे जिल्हा माहिती कार्यालय, बीड व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे आदि मान्यवर उपस्थित होते.

दिनांक १५ ते १७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अहिल्याबाई सांस्कृतिक सभागृह, भाजी मंडई रोड येथे सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनात मराठवाडा मुक्ती संग्राम आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील (सन १८५७ ते १९४७) विविध महत्त्वाच्या घडामोडी आणि थोर स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र तसेच माहिती स्वरुपात मांडण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती चित्र स्वरुपात पाहण्यासाठी या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 Indian Freedom Struggle Rare Photograph

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या वतीने विशेष पुस्तक प्रदर्शन देखील येथे मांडण्यात आले आहे.

 Indian Freedom Struggle Rare Photograph

तांबवेश्वर कला पथकाच्या शाहिरी पोवाड्यांच्या जयजयकारात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या भारतमाता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रदर्शन पाहण्यासाठी विविध शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतली. स्वाक्षरी फलकावर मान्यवरांनी स्वाक्षरी केली. या तीन दिवसीय प्रदर्शनादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह निमित्त सकस आहाराचे प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पाहा:


Tags: beedBeed Exhibitiongood newsIndian Freedom Amrit FestivalIndian Freedom Struggle Rare PhotographMarathwada Liberation Daymuktpeethचांगली बातमीबीडबीड प्रदर्शनभारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवभारतीय स्वातंत्र्यलढा दुर्मिळ छायाचित्रमराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीमुक्तपीठ
Previous Post

‘उड चलो’ संपूर्ण ‘फौजी परिवाराला’ सेवा पुरवणार, सेना कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांसाठी वयाची अट रद्द!

Next Post

भारतीय हवामान विभागात प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि इतर पदांवर १६५ जागांसाठी संधी

Next Post
Indian Meteorological Department

भारतीय हवामान विभागात प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि इतर पदांवर १६५ जागांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!