Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम, निवडणूक अधिकारी म्हणतात घेतली लिफ्ट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
evm (2)

मुक्तपीठ टीम

आसाम विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम वादाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये निवडणूक अधिकारी कारमध्ये ईव्हीएम घेऊन जाताना दिसत आहेत आणि ही कार भाजप नेत्याची असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर निवडणूक आयोगाने ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, त्यानंतर स्वाभाविकच राजकारण उफाळले आहे.

काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून म्हटले आहे की, अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत आणि निवडणूक आयोगाने यावर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. आसाममध्ये १ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. ३९ जागांसाठी ७४.६४% मतदान झाले. पहिल्या टप्प्यात येथे ७२.१४% मतदान झाले होते.

 

Every time there is an election videos of private vehicles caught transporting EVM’s show up. Unsurprisingly they have the following things in common:

1. The vehicles usually belong to BJP candidates or their associates. ….

1/3 https://t.co/s8W9Oc0UcV

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021

प्रियंका गांधींनी केले भाजपाला लक्ष्य

प्रियंका गांधी म्हणाल्या, “जेव्हा खाजगी वाहनांमध्ये ईव्हीएम आढळतात तेव्हा अशा घटना एकमेव घटना असल्याचे म्हटले जाते आणि त्यांना फेटाळून लावले जाते. व्हिडीओ उघडकीस आणणाऱ्या लोकांना भाजपावाले मीडियाचा वापर करत पराभव होणार असल्याने तसे आरोप केल्याचे सांगतात. खरं तर अशा बर्‍याच घटना घडत आहेत आणि कोणतीही कारवाई केली जात नाही. आयोगाने पाऊल उचलले पाहिजे. सर्व राष्ट्रीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापरावर पुनर्विचार करायला हवा. ”

आयोगाच्या गाडीत बिघाड, ईव्हीएम भाजपाच्या गाडीत

पाथरकांडी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक लोकांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवले होते. लोकांचे म्हणणे होते की, ही गाडी निवडणूक आयोगाची नव्हती. निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाल्यामुळे जवळून जाणाऱ्या गाडीला त्यांनी लिफ्ट मागितली होती. ती गाडी एका भाजप उमेदवाराची आहे. भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम असल्याचे कळताच जमावाकडून हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ईव्हीएम मशीन सुरक्षित असून त्यासोबत कोणतीच छेडछाड झाली नसल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे.


Tags: आसाम विधानसभाईव्हीएम मशीनप्रियांका गांधीभाजप
Previous Post

कोरोना लस घेतल्यानंतर काय करावं, काय टाळावं?

Next Post

राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याची काँग्रेसची मागणी

Next Post
nana patole

राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याची काँग्रेसची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!