मुक्तपीठ टीम
१०० पैकी एका मुलाला हृदयविकार असतो. लहान मुलांच्या ह्रदयामध्ये असलेल्या छिद्रामुळे त्यांचा जीव धोक्यात येवू शकतो.यामुळे त्याचे निदान लवकरात लवकर होणे महत्त्वाचे आहे.जर उपचार वेळेत न केल्यास दोष वाढू शकतात. यासाठी लोकांना जागृतही केले जाते. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात स्वांतंत्र्यदिनी शिवसेनेनं आयोजित केलेलं शिबिर अशा मुलांसाठी जीवनरेखा वाढविणारी मोठा मदतीचा हातच आहे. त्यानिमित्तानं हा विकार पुन्हा चर्चेत आला आहे. त्यासाठीच हा विकार नेमका आहे काय, त्याची लक्षणे आणि त्यावरील शस्त्रक्रियांबद्दलची इंटरनेटवरून जमवलेली माहिती मांडण्याचा हा प्रयत्न:
ह्रदयाला छिद्र असण्याचा विकार आहे तरी काय?
- लहान मुलांमध्ये सर्वाधिक एएसडी,व्हीएसडी आणि पीडीए यांचे प्रमाण आढळून येते.
- याला हृदयातील छिद्र असे म्हणतात.
- आपल्या हृदयात चार कप्पे असतात.
- पहिल्या दोन कप्प्यांना atrium असे म्हणतात,
- दुसऱ्या दोन कप्प्यांना ventricles असे म्हणतात.
- हृदयातून दोन मोठ्या रक्तवाहिन्या शरीराला अथवा फुफ्फुसाला रक्त पोहोचवतात.
- दोन्ही atrium मध्ये जी छिद्रे आढळतात त्यांना atrial septal defect (एएसडी) असे म्हणतात.
- दोन्ही व्हेन्ट्रिकल्समध्ये जी छिद्रे आढळतात त्यांना ventricular septal defect (व्हीएसडी) असे म्हणतात.
- हृदयामधून निघणाऱ्या दोन्ही रक्तवाहिन्यांना जोडणारी एक रक्तवाहिनी असते.
- ही रक्तवाहिनी आईच्या पोटात असताना प्रत्येक अर्भकामध्ये असते, पण जन्म झाल्यानंतर ती बंद होते.
- ती बंद न झाल्यास उद्भवणाऱ्या आजाराला patent ductus arteriosus असे म्हणतात.
हेही वाचा: हृदयाला छिद्र असलेल्या मुलांना स्वातंत्र्यदिनी व्याधीपासून स्वातंत्र्य
ह्रदयाला छिद्र असण्याच्या विकाराची लक्षणे
- धाप लागणे
- वेगाने
- थकवा वाटणे
- घाम येणे
- वजन न वाढणे
- छातीत दुखणे
- न्यूमोनिया होण्याची भीती असते.
- भूक न लागणे
- अंग निळं पडणे
ह्रदयाला छिद्राच्या विकारावर कशी होते शस्त्रक्रिया?
- हृदयातील कोणतेही छिद्र औषधांनी बुजू शकत नाही.
- हृदयात छिद्रे असलेल्या मुलांवर शस्त्रक्रिया झाल्याशिवाय त्यांचे वजन वाढणारच नाही.
- अल्ट्रासाऊंड स्कॅनने गर्भामधील जन्मजात हृदय दोष शोधण्यात मदत होते.
- यामध्ये दोन प्रकारची उपचार पद्धती आहे.
- प्रथम हार्ट सर्जरी किंवा डिव्हाइस प्रोसिजर या बालकांमध्ये करण्यात येऊ शकते.
- आपल्या छातीच्या समोर sternum नावाचे एक हाड असते.
- sternum हाड उघडून हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात येते.
- या शस्त्रक्रियेला ओपन हार्ट सर्जरी असे म्हणतात.
- एएसडी आणि व्हीएसडी बंद करण्यासाठी प्रामुख्याने ही पद्धत अवलंबली जाते.
- या शस्त्रक्रियेसाठी Heart-Lung मशिन वापरण्यात येते.
- हृदय बंद न करता जी शस्त्रक्रिया करण्यात येते, तिला क्लोज्ड हार्ट सर्जरी असे म्हणतात.
- या तीन आजारांमध्ये कधीकधी डिव्हाइस प्रोसिजरही शक्य होऊ शकते.
- या डिव्हाइस प्रोसिजरमध्ये जांघेमधून एक कॅथेटर हृदयाच्या आतपर्यंत पोहोचविण्यात येते.
- व त्या कॅथेटरमार्फत एक छत्रीवजा डिव्हाइसने एएसडी, व्हीएसडी अथवा पीडीए बंद करण्यात येते.
- या डिव्हाइस प्रोसिजरसाठी कॅथ लॅब नावाच्या यंत्रणेची गरज पडते.