Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईएसआयसी योजनेनुसार महिलांना प्रसुती रजेदरम्यान मिळणार पूर्ण दिवसाचा पगार!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Women Employee 5-12-21

मुक्तपीठ टीम

कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) ही कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कामगार आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत जागतिक स्तरावर सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक आहे. ईएससीआय साधारणतः १३ कोटी (१३० दशलक्ष) भारतीयांना प्रामुख्याने आजारपणाचे फायदे आणि काही इतर फायदे प्रदान करते ज्यात विमा उतरवलेले कर्मचारी आणि त्यांच्या आश्रितांचा समावेश आहे. याशिवाय गरोदरपणात महिलांना ईएससीआय योजनेतून भरपूर आर्थिक सहाय्य आणि फायदे मिळतात. ईएससीआय ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी एक ट्विट देखील केले आहे.

 

ईएसआयसीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “महिलांना प्रसूतीदरम्यान अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा प्रसूती रजेदरम्यान पगाराचा प्रश्न येतो, तेव्हा ईएसआयसी त्याचीही पूर्ण काळजी घेते. ईएसआयसी म्हणजे काळजीपासून मुक्तता.”

 

ईएससीआयच्या ट्विटनुसार, या योजनेअंतर्गत प्रसूती रजेदरम्यान, विमाधारक महिला सदस्यांना २६ आठवड्यांसाठी दैनंदिन वेतनाच्या १०० टक्के रक्कम दिली जाते. या योजनेशी संबंधित इतर माहिती आणि त्याच्याशी संबंधित लाभांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी महिला www.esic.nic.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. याशिवाय या योजनेचे इतरही अनेक फायदे आहेत.

 

योजनेचे इतर फायदे

  • प्रसूती रजेव्यतिरिक्त, ही योजना वैद्यकीय खर्च, हॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रिया, बेरोजगारीचे फायदे, अपंगत्व, नोकरीदरम्यान झालेल्या दुखापतींसाठी आर्थिक सहाय्य देखील प्रदान करते.
  • विमाधारक कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही, मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना १५,००० रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.
  • सेवानिवृत्त आणि कायमस्वरूपी अपंग विमाधारक व्यक्ती आणि त्यांच्या जोडीदारांना वार्षिक प्रीमियम रक्कम १२० रु. भरून वैद्यकीय सेवा देखील दिली जाते.
  • मासिक पगाराचा एक छोटासा भाग कर्मचारी आणि त्याच्या नियोक्त्याने ESIC योजनेसाठी द्यावा लागतो.

Tags: Employee State Insurance CorporationESICmaternity leavemuktpeethWomenईएसआयसी योजनाप्रसुती रजामहिलामुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्रासह देशभरातील स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्वे

Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियात नाशिकमध्ये प्राध्यापक, अटेंडर या पदांवर नोकरीची संधी

Next Post
Central Bank of India

सेंट्रल बँक ऑफ इंडियात नाशिकमध्ये प्राध्यापक, अटेंडर या पदांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!