मुक्तपीठ टीम
सध्या ईपीएफओची १३८ प्रादेशिक कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात पेंशन ट्रान्सफर करतात. अशा परिस्थितीत पेंशनधारकांना वेगवेगळ्या दिवशी पेंशन मिळते. केंद्रीय पेंशन वितरण प्रणालीच्या निर्मितीचा प्रस्ताव २९ जुलै रोजी होणार्या ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत मांडला जाईल. तो मान्य झाल्यानंतर एकाच वेळी सर्व पेंशनधारकांच्य खात्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पेंशनची पूर्ण रक्कम जमा होईल.
या योजनेनंतर १३८ क्षेत्रीय कार्यालयांच्या डेटाबेसच्या आधारे पेंशनचे वितरण केले जाईल. यामुळे ७३ लाख पेंशनधारकांना एकाच वेळी पेंशन दिली जाणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील पेंशनधारकांच्या गरजा वेगळ्या पद्धतीने हाताळतात. याद्वारे पेंशनधारकांना वेगवेगळ्या दिवशी पेंशन देता येते.
प्रादेशिक कार्यालयाचा डेटा केंद्रीय डेटाबेसमध्ये ट्रान्सफर केला जाईल
२० नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सीबीटीच्या २२९व्या बैठकीत, सीडॅकद्वारे केंद्रीकृत आयटी आधारित प्रणाली विकसित करण्याच्या प्रस्तावाला विश्वस्तांनी मान्यता दिली होती. कामगार मंत्रालयाने बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यानंतर प्रादेशिक कार्यालयांचे तपशील टप्प्याटप्प्याने केंद्रीय डेटाबेसकडे ट्रान्सफर केले जातील. यामुळे सेवांचे संचालन आणि पुरवठा सुलभ होईल.