मुक्तपीठ टीम
देशभरातून हिमाचल प्रदेशात हिम पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रसिद्ध लाहौल खोरे पाहायचंच असतं. पण अनेकदा तिथं जाणं शक्य नसतं. त्यामुळे पर्यटकांचा हिरेमोड ठरलेलाच. आता मात्र हिमाचल सरकारने तेथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. हिवाळ्यात साजरा होणाऱ्या स्नो फेस्टिव्हलला पर्यटनाशी जोडण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पहिल्यांदाच हेलिपॅड आणि अॅप्रोच रस्त्यांवरील बर्फ साफ करण्यासाठी सुमारे शंभर कामगार तैनात करणार आहे. बीआरओ हिवाळ्यात लाहौल खोऱ्यातील मुख्य रस्त्यांची देखभाल करेल, त्यांना चांगल्या स्थितीत राखेल. खराब हवामानात प्रशासन अटल बोगद्याच्या उत्तर पोर्टलवरून पर्यटकांना येऊ देणार नाही. पण जर हवामान स्वच्छ असेल तर पर्यटक केवळ स्नो फेस्टिव्हलचाच भाग होणार नाहीत, तर त्याचबरोबर थंड वाळवंटाचा आनंदही घेऊ शकतील.
लाहौल खोरं फिरणं आता बर्फातही शक्य!
- अटल बोगद्याच्या निर्मितीनंतर राज्यातील दूरवरच्या भागात तसेच लाहौल खोऱ्यात पोहोचणे सोपे झाले आहे.
- लाहौल खोऱ्यातील लोकांसाठी अटल बोगदा वरदान ठरला आहे.
- हिवाळ्यात लाहौलच्या हेलिपॅड किंवा लिंक रोडवरील बर्फ साफ करण्यासाठी सुमारे १०० कामगार तैनात केले जातील.
- हिवाळ्यात संपर्क मार्ग पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
पर्यटकांच्या सुविधेसाठी सरकारी यंत्रणा दक्ष असेल.
हिवाळ्यात कसे राखणार रस्ते चांगले?
- बीआरओ हिवाळ्यात लाहौल खोऱ्यातील रस्त्यांची देखभाल करण्याचा प्रयत्न करेल.
- हिमस्खलनाचा सामना करण्यासाठी संरक्षण भू-माहिती संशोधन आस्थापना म्हणजेच डीजीआरईची मदत घेतली जाईल
- वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले जातील.
- हिवाळ्यातही लाहौल खोऱ्यातील सर्व रस्ते पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.
- लाहौल खोऱ्यात साजरा होणारा स्नो फेस्टिव्हल पर्यटनाशी जोडला जाईल.
- त्यासाठी उत्कृष्ट दर्जाची व्यवस्था करण्यात येत आहे.