Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जन्मत: हात नसलेल्या मुलाला कृत्रिम हात मिळाला, चेहऱ्यावर अमूल्य आनंद बहरला!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
childs first prosthetic hand

मुक्तपीठ टीम

आपल्या शरीराचा एक एक अवयव हे महत्वाचे आहे. जर एखादा अवयव नसेल तर जीवन परावलंबी बनण्याची भीती असते. ज्यांच्याकडे धडधाकट शरीर आहे, अशांपैकी अनेकांना त्याचे मोल माहित नसते, पण ज्यांच्याकडे ते नाही त्यांना विचाराल तर त्याचं मोल कळतं. अशा कमतरतेवरही मात करत कर्तृत्व गाजवणारे अनेक प्रेरणादायी दिव्यांग सभोताली असतात. पण एखाद्या दिव्यांगाच्या शरीरातील उणीव भरून काढली, तर त्याला होणाऱ्या आनंदानाची तुलनाच होऊ शकत नाही. तो आनंद अनमोलच. एका लहान मुलाचा असा आनंद दाखवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्या मुलाचा चेहऱ्यावरचा निरागस आनंद हा पाहण्यासाठी नेटकरी वारंवार तो व्हिडीओ पाहत आहेत, दुसऱ्यांनाही पाठवत आहेत. अशी निरागस, आनंददायी चांगली बातमी आगळीच.

 

लहानग्या मुलाला हात मिळतो…चेहऱ्यावरचा आनंद जगावेगळा निरागस असा!

  • Amazing Post या ट्वीटर हँडलने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
  • या व्हिडीओमध्ये एक लहान मूल बसलेले दिसते.
  • त्यात डॉक्टर त्याला कुत्रिम हात लावताना दिसत आहेत.
  • जेव्हा डॉक्टरांनी या लहान मुलाला कुत्रिम हात लावला तेव्हा तो आनंदाने आपल्या हाताकडे पाहतोय.
  • त्या लहानग्याला एवढा आनंद होतो की तो वारंवार त्याला स्पर्श करतोय, तो डॉक्टरकडे पाहतो, हसतो.
  • त्याच्या पालकांकडे पाहूनही तो हसतोय.
  • त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक अनमोल हास्य बहरले आहे.

 

हा व्हिडीओ शेअर करत ट्वीटमध्ये ‘मुलाला त्याचा पहिला कृत्रिम हात मिळाल्यावर होणारा आनंद.’ एवढंच लिहिलंय. पण त्या व्हिडीओतील भाव असे आहेत की मन राहवत नाही, वारंवार तो व्हिडीओ पाहावा असं वाटत राहतं. जगात मुलांना खुश करण्यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही.

 

हा व्हिडिओ पाहून लोक भावूक होत आहेत. एका ट्विटरकराने लिहिले की, त्याने इतका सुंदर व्हिडिओ कधीच पाहिला नाही. मुलाला हात मिळाल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला. त्याने लिहिले की कदाचित ही त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम भेट असावी!

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Amazing Postfirst prosthetic handGoodNewsकुत्रिम हातचांगली बातमी
Previous Post

राज्यात ७९६ नवे रुग्ण, ९५२ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

हिमाचलच्या लाहौल खोऱ्यात आता हिवाळ्यातही फिरा, स्नो फेस्टिव्हलसाठी खास व्यवस्था!

Next Post
lahaul valley

हिमाचलच्या लाहौल खोऱ्यात आता हिवाळ्यातही फिरा, स्नो फेस्टिव्हलसाठी खास व्यवस्था!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!