मुक्तपीठ टीम
एलॉन मस्क यांच्या हाती ट्विटरची कमान मिळाल्यानंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगामी काळात कोणते बदल घडू शकतात, याची जोरदार चर्चा सुरू आहे. इलॉन मस्क स्वत: मानतात की ट्विटरसारखे प्लॅटफॉर्म ‘फ्री स्पीच’ला प्रोत्साहन देण्यासाठी आहेत. आता त्यांनी ‘फ्री स्पीच’ म्हणजेच मुक्त भाषणाचा अर्थही सांगितला आहे. ट्विट करताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मते भाषण स्वातंत्र्य म्हणजे काय.
एलॉन मस्कने काय ट्विट केले आहे?
एलॉन मस्क यांनी ट्विट केले की, “मी कायद्याच्यापलीकडे जाणाऱ्या सेन्सॉरशिपच्या विरोधात आहे. माझ्यासाठी भाषण स्वातंत्र्य म्हणजे कायद्यानुसार आहे. लोकांना कमी भाषणस्वातंत्र्य हवे असेल तर त्यांनी सरकारकडे याबाबत कायदा करण्याची मागणी केली पाहिजे.”
बंदी घातलेल्या प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “सत्य बातम्या दाखवण्यासाठी अनेक माध्यम संस्थांच्या खात्यांवर बंदी घालणे चुकीचे आहे. ट्विटरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बॅन केले आहे. त्यामुळे ट्विटरवर त्यावेळी बरीच टीका झाली होती.” एलॉन मस्क यांना ट्विटरवर सर्वात मोठे टीकाकार अपेक्षित आहेत. कारण मुक्त भाषणाचा अर्थ असा आहे.