मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच मोठी कारवाई केली आहे. एलोन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. मात्र जर पराग अग्रवाल यांना कंपनीतून काढून टाकले तर ट्विटरला त्यांना मोठी रक्कम द्यावी लागेल.
किती मिळणार पराग अग्रवाल यांना पैसे?
- ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी मोठे बदल केले आहेत.
- एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली आहे.
- मात्र जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या कंपनीचा सीईओ बनते तेव्हा पगाराव्यतिरिक्त त्याला कंपनीचे काही शेअर्सही दिले जातात.
- अशा परिस्थितीत जर एलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल यांना ट्विटरवरून हटवले, तर त्यांचे सर्व शेअर्स कंपनीला द्यावे लागतील. वृ
पराग अग्रवाल यांना सुमारे ३४६ कोटी रुपये दिले जातील.
पराग अग्रवाल व्यतिरिक्त या लोकांना कामावरून कमी करण्यात आलाय!
- एलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर पराग अग्रवाल यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
- लीगल आणि पॉलिसी विभागाच्या प्रमुख विजया गड्डे, चीफ फायनान्स ऑफिसर नेद सेगल आणि २०१२ पासून ट्विटरचे सामान्य सल्लागार सीन एजेट यांनाही काढून टाकण्यात आले आहे.
७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात!!
- एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे.
- सध्या ट्विटर कंपनीमध्ये ७ हजार ५०० कर्मचारी कार्यरत आहेत.
- रिपोर्टनुसार, एलॉन मस्क ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या विचारात असल्याचं समोर येत.
- तसेच ट्विटर डील पूर्ण झाल्यानंतर कंपनीमध्ये हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे.