मुक्तपीठ टीम
अमेरिकेत नुकताच ऑटो शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये फोर्ड, बीएमडब्ल्यू, होंडा, जीप, निसान आणि टोयोटासह २४ ब्रँड सहभागी झाले. सध्याचा काळ हा ई-कारचा असल्याने त्यांचा बोलबाला होता. त्यातही सर्वात मोठं वैशिष्ट्य असं की काही कार या केवळ वीजेवर चालणाऱ्याच नाहीत तर त्या वीज नसताना घरालाही वीज पुरवठा करतील अशा क्षमेतेच्या आहेत.
त्यातील अनेक कार या कार ५-१० मिनिट चार्जिंग केल्यास ९० किमीपर्यंत धावतील. यामध्ये वाहन चालविण्यास जास्त वेळ मिळेल आणि चार्जिंगला कमी वेळ लागेल. पूर्ण चार्ज केल्यास ४८० किमी अंतरापर्यंत चालेल. तसेच, चार्जिंगच्या केवळ १० मिनिटांत ८७ किमी चालेल.
फोर्ड लाइटनिंग १५०
• वीज गेल्यावर ही इलेक्ट्रिक कार जनरेटर म्हणून कार्य करेल.
• संपूर्ण घरात तीन दिवस वीजपुरवठा देण्यास सक्षम असेल.
• वीज गेल्यावर आपोआप पुरवठा सुरू होईल.
• यात नॅचरल व्हॉईस कंट्रोल, क्लाऊड बेस्ड नेव्हिगेशन यासारखी वैशिष्ट्ये आहेत.
• अमेरिकेत या कारची किंमत ३० लाख आहे.
किआ ईव्ही ६
• किआची ही पहिली इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर आहे.
• केवळ १८ मिनिटांत ८०% चार्ज होते.
• फूल रेंज ५८० किमी आहे.
• कंपनीचे प्रमुख मायकल मॅकहेल यांच्या मते, या कारचा एसयूव्ही कारसारखा लूक आहे, पण ही स्पोर्ट्स कारसारखी आहे.
• ती पोर्टेबल पॉवर जनरेटरचेही कार्य करते.
• ई-बाईक, लॅपटॉप, घरगुती उपकरणे चालवता येतील.
• या कारची किंमत ३३ ते ३६ लाख रुपयांपर्यंत आहे.
निसान एरिया
• ही पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.
• त्याचे इंटीरियर स्टारशिपवरील कॅफे लाऊंजवर मॉडेल केलेले आहे.
• हे सिंगल चार्जिंगमध्ये ६१० किमीची रेंज देईल.
• यात पॉवर स्लाइडिंग कन्सोल आहे, जे अॅडजस्ट केले जाऊ शकते. यात अॅपल कारप्ले, अलेक्सा आणि अॅन्ड्रॉइडसाठी वायरलेस इंटीग्रेशन आहे.
• इतर इलेक्ट्रिक एसयूव्हीप्रमाणे फ्रन्ट ट्रंक नाही आहे.
• सुरुवातीची किंमत ३५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.