Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजकीय उड्डाणं करतानाच विमानही चालवणारे कॅप्टन रुडी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
rajeev pratap rudy

मुक्तपीठ टीम

आपल्याकडे राजकारणी म्हटलं की तो आणखीही काही करत असेल असं वाटतच नाही. भारतात राजकारण हा फुलटाइम धंदा मानणाराही एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे स्वाभाविकच तसा समज असावा. पण अनेक राजकीय नेते वेगळे आहेत. स्वत:ची राजकीय जबाबदारी निभावतानाच ते व्यावसायिक कर्तव्याकडेही डोळेझाक करत नाहीत. भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी हे अशांपैकीच एक!

 

राजीव प्रताप रुडी यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते पायलटच्या गणवेशात दिसत आहेत. त्या विमानात संसदीय समितीचे सदस्य खासदार उपस्थित होते. कॅप्टन म्हणून रुडी यांनी सर्व प्रवाशांचे स्वागत केले आणि प्रवास करणाऱ्या सर्वात लहान प्रवासी असलेल्या मुलीची ओळखही करून दिली. ही मुलगी भाजपा खासदार मनोज तिवारी यांची ६ महिन्यांची मुलगी संविका होती.

 

व्हिडीओमध्ये रूडी असे म्हणत आहे की, “हा प्रवास भारताच्या इतिहासात खूप खास आणि अनोखा असणार आहे. हा एक अतिशय सुंदर दिवस आहे.”

 

रुडींच्या विमानात होते तरी कोण कोण?

• संसदीय समितीचे अध्यक्ष व्यंकटेश
• बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी
• उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत
• भाजपचे खासदार मनोज तिवारी
• असे बरेच खासदार आणि त्यांचे कुटुंबीय या विमानात उपस्थित होते.

 

डिएमकेचे नेते दयानिधी मारन यांचा अविस्मरणीय विमान प्रवास

  • १३ जुलै रोजी डीएमकेचे नेते दयानिधी मारन यांनी दिल्ली ते चेन्नईपर्यंतचा विमान प्रवास केला होता.
  • त्यांच्यासाठी हा प्रवास इतका अविस्मरणीय ठरला की, मारन यांनी त्याचा विशेष उल्लेख अधिकृत पत्रात केला.
  • मारन यांनी या पत्राचे नाव ‘अ फ्लाइट टू रिमेम्बर’ असे ठेवले आहे.
  • तसं का तर, जेव्हा मारन विमानात पोहोचले आणि बोर्डिंग प्रक्रिया जाहीर झाली, तेव्हा मास्क घातलेला विमानाचा कॅप्टन त्याच्याकडे आला.
  • ते कोणी दुसरे नाही तर, राजीव प्रताप रुडी स्वत: होते.
  • यानंतरची कहाणी मारन यांनी एका पत्रात शेअर केली आहे.
  • हे पत्र १३ जुलै रोजी लिहिले होते.

 

राजीव प्रताप रुडी व्यावसायिक पायलट!

• राजीव प्रताप रुडी हे व्यावसायिक पायलट लायसन होल्डर
• रुडी हे व्यावसायिक विमानाचे पायलट लायसेन्स होल्डर आहेत.
• ते बर्‍याचदा विमान उडवतात.
• ते त्यासंबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात.

 

काही दिवसांपूर्वी बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी व्हिडीओ शेअर करत जाहीर केले की, त्यांनी कोलकाता विमानतळावर इंडिगोच्या दरभंगासाठीच्या विमानसेवेचा शुभारंभ केला तेव्हा त्यांच्या विमानाचे सारथ्य कॅप्टन राजीव प्रताप रुडी यांनीच केले. देशाला खरोखरच असेच नेते पाहिजे आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत, त्यात कमीपणा न मानता अभिमानाने ते मिरवणारे! वेल डन कॅप्टन रुडी!

 

पाहा व्हिडीओ:


Tags: manoj tivarisushilkumar Shindeउपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदीखासदार मनोज तिवारीसंजय कुमार झा
Previous Post

वारकऱ्यांच्या सतत, अथक आरोग्य सेवेचा एक असाही ‘वैष्णव’ धर्म…

Next Post

वीज गेली? काळजी नको! ईलेक्ट्रिक गाड्या घरासाठी वीज पुरवणार!

Next Post
e cars

वीज गेली? काळजी नको! ईलेक्ट्रिक गाड्या घरासाठी वीज पुरवणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!