Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उमंग अॅपवर मिळणार सरकारी कार्यालयांचे लाईव्ह लोकेशन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
umang

मुक्तपीठ टीम

सरकारच्या उमंग अॅपने मॅप माय इंडियासह भागीदारी केली आहे. यामुळे आता उमंग अॅपवर पोलीस स्टेशन, सरकारी रेशन दुकाने, ब्लड बँक यांसारखी सरकारी कार्यालये आणि दुकानांचे लाईव्ह लोकेशन उपलब्ध होईल. अ‍ॅपवर फक्त ठिकाणांचीच माहिती मिळणार नाही, तर तुम्हाला सरकारी सेवा केंद्रांच्या इमारती, त्यांच्या रस्त्यांविषयीही सखोल माहिती मिळेल. तसेच, आपल्या येथून सरकारी सेवा केंद्र किती दूर आहे. ही माहिती देखील मिळू शकते. संबंधित ठिकाणे अ‍ॅपवर लाइव्ह पाहिली जाऊ शकतात. तसेच व्हॉईस आणि व्हिज्युअल्सला ही हे सपोर्ट करेल. यामुळे सरकारी कार्यालये शोधणे आणि तेथे पोहोचणे सुलभ होईल. यासह, नेव्हिगेशन दरम्यान रहदारी आणि रस्ता सुरक्षेचा तपशील देखील उपलब्ध असेल.

 

उमंग अॅपद्वारे ग्राहकांना मिळणार विविध सेवा

• उमंग अॅपवर सर्वात जवळच्या सरकारी रेशनिंग दुकानाची माहिती मिळते.
• ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट्स’ म्हणजेच वीज पडण्याआधी माहिती मिळेल आणि लोकांना सावधान करेल. वीज पडणाऱ्या भागात लोकांना सतर्क केले जाईल.
• ईएसआयसीवर वापरकर्त्यांना ईएसआयसी केंद्राचे स्थान मिळेल. जसे दवाखाने आणि रुग्णालयांचे लाईव्ह लोकेशन मॅपवर मिळेल.
• इंडियन ऑइलवर जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपच्या रिटेलर्स आणि डिस्ट्रीब्यूटर्सचे लोकेशन मिळेल. तसेच, गॅस स्टेशन आणि इंधन भरण्याचे स्टेशन यांचे लोकोशन मिळेल.
• एनएचएआयवर वापरकर्त्यांना टोल प्लाझा आणि टोल रेटची माहिती मिळू शकेल.
• जवळचे पोलिस स्टेशन शोधता येते.
• मेरी सडकवर वापरकर्त्यास खराब रस्त्याबद्दल तक्रार करता येईल.

 

उमंग अॅप केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. उमंग मोबाइल अॅप पंतप्रधान मोदी यांनी सन २०१७ मध्ये लॉन्च केला होता. उमंग अॅपवर सुमारे १२५१ सरकारी सेवा आणि सुमारे २०,२८० उपयुक्तता बिल देय सेवा उपलब्ध आहेत. उमंग अॅप ३.४१ कोटीहून अधिक वेळा डाउनलोड केला गेला आहे.

 

उमंग अॅप डाउनलोड कसा करावा

• उमंग अॅप हा ९७१८३-९७१८३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन डाउनलोड केला जाऊ शकतो.
• या व्यतिरिक्त https://web.umang.gov.in/web/#/ वरून देखील डाउनलोड केला जाऊ शकतो.
• अॅन्ड्रॉइड वापरकर्ते https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.umang.negd.g2c वर क्लिक करुन अ‍ॅप डाउनलोड करू शकतात.
• आयओएस वापरकर्ते https://apps.apple.com/in/app/umang/id1236448857 वरून उमंग अॅप डाउनलोड करू शकतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: umang appआयओएसउमंग अॅपपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

वीज गेली? काळजी नको! ईलेक्ट्रिक गाड्या घरासाठी वीज पुरवणार!

Next Post

नाबार्डमध्ये व्यवस्थापकीय दर्जाच्या १६२ जागांसाठी करिअर संधी

Next Post
nabard

नाबार्डमध्ये व्यवस्थापकीय दर्जाच्या १६२ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!