Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला: “ईडीच्या भीतीने आमच्याकडे नको!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
eknath shinde vs sanjay raut

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांवर ही कारवाई केली आहे. या प्रकरणावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणेच्या भीतीने आमच्याकडे व भाजपाकडे येण्याचे ‘पुण्यकाम’ करू नका, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

केंद्रीय यंत्रणा मागे लागली असेल, तर आमच्याकडे व भाजपाकडे येऊ नका- एकनाथ शिंदे

  • ईडीची भीती दाखवून शिंदे गटात व भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
  • यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,राऊत यांना कोणी बोलावले नाही.
  • त्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे.
  • त्यात त्यांचा दोष आहे की नाही, हे समजेल.
  • राऊत स्वत:च ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणायचे.
  • महाविकास आघाडीचे ते मोठे नेते होते.
  • तुम्ही रोज सकाळी त्यांना टीव्हीवर दाखवत असत; पण आम्ही सुडाचे राजकारण करत नाही.
  • तसे केले असते तर न्यायालयाने सरकारला फटकारले असते; पण तसे घडत नाही.
  • त्यामुळे चौकशी हा स्वतंत्र विषय आहे; पण अशी भीतीमुळे आलेली माणसे आमच्याकडे नकोत.
  • मी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो आहे की, कोणाच्या मागे यंत्रणा लागली असेल तर आमच्याकडे व भाजपाकडे येऊ नका.
  • कोणावर तरी दबाव टाकून कोणालाही आमच्यात घेतलेले नाही.
  • अर्जुन खोतकर यांचा प्रवेश या दबावातून असल्याची चर्चा सर्वत्र होती.
  • मात्र अर्जुन असो वा कोणी असो, असे दबावाने कोणाला आमच्यात घेतले नाही.

एकनाथ शिंदेंच्या नावाने घरात १० लाख मुद्दाम ठेवले असतील: केसरकर

  • संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या १० लाखांच्या रक्कमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहण्यात आले होते.
  • कदाचित संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काही करायचे असेल, त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचे असेल.
  • त्यासाठी संजय राऊत यांनी हे पैसे राखीव ठेवले असतील.
  • या पैशांचा स्रोत दाखवावा लागेल.
  • तो त्यांनी दाखवावा, राऊत यांच्याकडे त्याबाबत माहिती असेल, असे केसरकर यांनी म्हटले.
  • तसेच संजय राऊत यांनी हे पैसे जाणीवपूर्वक ठेवले असावेत, अशी शक्यताही दीपक केसरकर यांनी बोलून दाखवली.
  • संजय राऊत यांनी मुद्दाम या पैशांवर एकनाथ शिंदे यांचे नाव लिहले असेल तर ते कोणालाही कळणार नाही.
  • कारण संजय राऊत अत्यंत हुशार आणि बुद्धिमान आहेत. ते काहीही करू शकतात.
  • पण या पैशांशी एकनाथ शिंदे यांचा कोणताही संबंध नाही.
  • आम्ही गुवाहाटीमध्ये असतानाही आमदारांना पैसे देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
  • परंतु, तेव्हाही आम्ही आमच्या हॉटेलच्या रूम आणि घरांची झडती घ्या.

Tags: BJPEknath ShindePatrachawl Scamsanjay rautShivsenaएकनाथ शिंदेपत्राचाळ घोटाळाभाजपाशिवसेनासंजय राऊत
Previous Post

आजपासून कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात कपात, घरगुती नाही!

Next Post

अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!