मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्र हादरला आहे. एकनाथ शिंदे सध्या ४० हून अधिक आमदारांसह गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. दरम्यान पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बंडखोरी का केली याचं कारण स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..#MiShivsainik @rautsanjay61— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
- मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
- यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..
महाराष्ट्रातील वाद सर्वोच्च न्यायालयात!
- शिवसेनेकडून सुरू असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
- याबरोबरच अजय चौधरी यांच्या नियुक्तीला देखील शिंदे गटाने याचिकेद्वारे आव्हान देले आहे.
- शिवाय शिंदे गटाच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे.
- एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले या दोघांकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
- आज या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
- एकनाथ शिंदे यांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामांकित वकील हरीश साळवे तर महाविकास आघाडीच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी असणार आहेत.