Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय! पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा नक्षलवादाविरोधात विकासाचा मंत्र!

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde on govt medical college in Gadchiroli

मुक्तपीठ टीम

राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदवीची पहिली बॅच सुरू करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. या प्रस्तावाला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी तत्वतः मंजुरी दिली आहे.

 

ही आहे यामागची भूमिका

  • गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.
  • या जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्यात, तसेच येथील स्थानिक आदिवासी मुलांना तिथेच वैद्यकीय उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयाच्या जागी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
  • जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांवर उपचार करण्यासाठी अनेकदा त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला हलवावे लागते.
  • यात बराच वेळ खर्ची पडत असल्याने या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिल्यास अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता येतील, अशी त्यामागची त्यांची भूमिका आहे.

 

आगामी शैक्षणिक वर्षांपासून गडचिरोलीमध्ये पदवीची पहिली बॅच सुरू

  • गुरुवारी झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याची ही गरज लक्षात घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हे महाविद्यालय सुरू करण्याला तत्वतः मंजुरी दिली.
  • त्यासोबतच महाविद्यालयात शिकवण्यासाठी लागणारा स्टाफ उपलब्ध होण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे अश्वासन दिले.
  • तसेच, जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यास देखील सांगितले.
  • वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यास आगामी शैक्षणिक वर्षांपासून गडचिरोलीमध्ये पदवीची पहिली बॅच सुरू करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

 

शिंदेंचे अमित देशमुखांना आश्वसन

  • याबाबत मंत्री शिंदे यांनीही हे विभाग जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ, तसेच नागपूरमधील डॉक्टरांना गडचिरोलीमध्ये काम करण्यासाठी अतिरिक्त इंसेंटिव्ह देण्याबाबत निर्णय घेऊ, असे देशमुख यांना आश्वस्त केले.
  • गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय रुग्णालय खाजगी अथवा पीपीपी स्वरूपात करता येणे शक्य नसल्याने ही जबाबदारी शासनानेच उचलावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचे देखील शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
  • बैठकीला गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Tags: amit deshmukhEknath ShindeGadchiroligovernment medical collegeअमित देशमुखएकनाथ शिंदेगडचिरोलीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय
Previous Post

ग्रामीण भागात कोकेनचा फैलाव करण्याचं रॅकेट उधळलं, सांगलीत ११ लाखांच्या कोकेनसह टांझानियन तरुण जेरबंद!

Next Post

विदर्भाच्या मातीतील, विदर्भातील लोकांनी तयार केलेला ‘जयंती’ पाहावा असा!

Next Post
jayanti movie

विदर्भाच्या मातीतील, विदर्भातील लोकांनी तयार केलेला 'जयंती' पाहावा असा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!