Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

March 9, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
eknath Shinde

मुक्तपीठ टीम

मुळा-मुठा नदीचे प्रदूषण होवू नये  यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत जलशुध्दीकरणाचे काम सुरू असून या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

         

मुळा-मुठा नदीचे पात्र मोठे असून त्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात आहेत. जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत आहे. जलपर्णीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा याबाबत सदस्य सिध्दार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री राहुल कुल, अतुल बेनके, रोहित पवार यांनी सहभाग घेतला

        

लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवाजीनगर (जि. पुणे) येथे मुळा-मुठा नदीचे पात्र मोठे असून त्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात आहेत. जलपर्णीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येणार आहे. यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत भविष्यकालीन लोकसंख्या विचारात घेवून जलशुध्दीकरण प्रकल्पाची कामे टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येत आहे.जलपर्णीच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जलपर्णी काढण्यासाठी सहा पॅकेजमध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती.पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या नाल्याव्दारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या नदीमध्ये मिसळणारे घरगुती स्वरूपाचे सांडपाणी बंद करून घरगुती सांडपाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेकडून मैलापाणी शुध्दीकरण करण्यासाठी रू.९९०.२६ कोटींचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून या प्रकल्पांतर्गत १३ पॅकेजेसमध्ये मैलापाणी शुध्दीकरण केंद्रे संवर्धनासाठी विविध कामे करण्यात येणार आहेत. तसेच नदीच्या दोन्ही काठांच्या कडेने मोठ्या व्यासाची मलवाहिनी टाकण्यात येणार असून त्यामध्ये नदीला मिळणाऱ्या नाल्यांमधील मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्पापर्यंत पोहचवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. जेणेकरून नदीमध्ये येणारे मैलापाणी थोपवणे शक्य होणार आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


Tags: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेमुळा-मुठा नदी
Previous Post

खासगी शाळांच्या शुल्क नियंत्रणासाठी विभागीय स्तरावर समित्या स्थापन

Next Post

नार-पार खोऱ्यातील पाणी गुजरात राज्याला देण्यात येणार नाही – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Next Post
Jayant Patil

नार-पार खोऱ्यातील पाणी गुजरात राज्याला देण्यात येणार नाही - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!