मुक्तपीठ टीम
वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगवाला. ध्येयवेडे इतिहास घडवतात, राजसाहेब, आम्ही पण साडेतीन महिन्यांपूर्वी दौड लावली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ध्येयवेडे इतिहास घडवतात!!
- अनेक संकटांवर मात करत त्यांनी यश मिळवलं आहे.
- त्यांना मी आपल्या सगळ्यांच्यावतीनं शुभेचच्छा देतो.
- खर म्हणजे या सिनेमात वीर मराठे आहेत आणि वेड आहे.
- कवी कुसुमाग्रजांनी वेडात मराठेवीर दौडले सात असं म्हटलंय त्यातही काही चुकीचं नाही.
- ध्येयवेडे इतिहास घडवतात, राजसाहेब, आम्ही पण साडेतीन महिन्यांपूर्वी दौड लगावली.
- कुठून कसं गेलो माहिती नाही.
- जनतेचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय.
- राज ठाकरे आणि मी एकत्र येतोय खरं म्हणजे १० वर्षांचा बॅकलॉग भरुन काढतोय.
राज ठाकरे कलावंतांच्या पाठिशी उभे राहतात- एकनाथ शिंदे
- शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांची बांधणी, त्यावेळचं इंजिनिअरिंग, गडावरील तोफा हे सर्व पाहिल्यानंतर हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही.
- हे पाहिल्यावर आपल्यासमोर दिव्य दृष्टीचा राजा समोर येतो.
- नक्कीच आपल्याला चांगलं यश मिळेल.
- मराठी आणि हिंदी कलाकारांच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे.
- बाळासाहेब ठाकरे कलावंतांच्या पाठिशी उभं राहत होते.
- राज ठाकरे देखील कलावंतांच्या पाठिशी उभे राहतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
- मुंबई आणि ठाण्याच्या दरम्यान नवी चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.