मुक्तपीठ टीम
राज्यातील शिवसेना- शिंदे गटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोर ३८ आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकारने बहुमत गमावले आहे.
महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये!
- शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
- त्यावेळी ३८ आमदारांच्या गटानं सरकारचा पाठिंबा काढला असल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं आहे.
- शिवसेनेचे विधानसभेत ५५ आमदार आहे.
- शिंदे गटाच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडं ११५ आमदाराच उरले आहेत.
- त्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे.
- विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १४४ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
- शिवसेना नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचंही याचिकेत सांगण्यात आलं आहे.
- संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील सत्ताकारण सर्वोच्च न्यायालयात!!
- एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रात भूकंप आला आहे.
- शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.
- बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
- तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.
- आता सर्वोच्च न्यायालय आज सुनावणीत काय निर्देश देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका
Eknath Shinde Petition एकनाथ शिंदे याचिका 26.06.2022