मुक्तपीठ टीम
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना कर्नाटकातील काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीच्या या कारवाईला काँग्रेसने अत्याचार असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे (E)lection (D)epartment आल्याची टीकाही केली जात आहे.
ईडीच्या समन्सनंतर शिवकुमार यांची प्रतिक्रिया-
- ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिवकुमार यांनी सांगितले की, मला माहिती नाही, ईडीने मला का समन्स बजावले आहे.
- ज्या लोकांशी त्यांचे व्यावसायिक व्यवहार आहेत त्यांची चौकशी केली जात आहे.
- मला माहित नाही की मी कोणते बेकायदेशीर काम केले आहे.
शिवकुमार यांना याआधी केले होते अटक!!
- ईडीने ३ सप्टेंबर २०१९ रोजी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
- ईडीने या वर्षी मे महिन्यात शिवकुमार आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
- आयकर विभागाने केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे.
- प्राथमिक तपासात, आयकर विभागाने काँग्रेस नेत्याशी संबंधित असलेल्या बेहिशेबी मालमत्तांचा खुलासा केला होता.
- त्यावेळी डीके शिवकुमार यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते.
ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्याची मला माहिती नाही, डीके शिवकुमार
- शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते डीके शिवकुमार म्हणाले की, दररोज माझ्या आजूबाजूला राहणारे लोक, माझ्यासोबत व्यावसायिक व्यवहार करणाऱ्या लोकांना ईडी आणि सीबीआयकडून बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे.
- त्याची सुरुवात कुठून झाली, असा प्रश्न मी उच्च न्यायालयात केला आहे.
- ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्याची मला माहिती नाही.
- फक्त सीबीआयने एफआयआर नोंदवला होता.
- ईडीने कोणती एफआयआर नोंदवली आणि का, मला माहिती नाही.
काही लोकांकडून माझ्यावर चौकशी केली जातेय:
- शिवकुमार म्हणाले की, एका प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते आणि त्या संदर्भात ते न्यायालयात हजर झाले होते.
- ते म्हणाले की, दुसऱ्या प्रकरणासंदर्भात काही लोकांकडून माझ्यावर चौकशी केली जात आहे, ते असे का करत आहेत हे मला माहीत नाही.
- मी याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेन.
- त्यांनी मला सोमवारी बोलावले असून मी माझ्या वकिलांशी बोलत आहे.
- विधानसभेचे अधिवेशन सुरू असून ‘भारत जोडो यात्रा’ही सुरू आहे, तसेच माझ्या स्वत:च्या जबाबदाऱ्या आहेत.