Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर ईडीकडून नबाव मलिक यांना अटक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nawab Malik Finally Arrested by ed

मुक्तपीठ टीम

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अखेर ईडीने अटक केली आहे. आज पहाटे साडेचार वाजता ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी पोहचलं. सीआयएसएफ जवानांसोबत तिथं पोहचलेल्या ईडीच्या पथकानं त्यांना सोबत घेऊन ईडीच्या कार्यालयात नेलं. त्यानंतर त्यांची माफिया डॉन दाऊद इब्राहिमविरोधातील मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. तीनच्या नंतर त्यांना ईडी कार्यालयाबाहेर आणण्यात आल्यानंतर त्यांनी “लढणार आणि जिंकणार” अशी प्रतिक्रिया दिल्याचे कळते. ईडीकडून अटकेनंतर नियमानुसार त्यांना आरोग्य तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे.

 

मलिकांना अटक का?

  • पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे पथक सीआयएसएफ जवानांच्या सुरक्षेसह मलिकांच्या घरी पोहचले.
  • डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे.
  • मलिक यांना सकाळी ७ वाजल्यापासून मुंबईच्या ईडी कार्यालयात आणले आहे.
  • माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात मलिकांची चौकशी सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे.
  • किरीट सोमय्यांनी तसं ट्वीटही केले.
  • त्याचबरोबर बॉँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी केलेल्या मालमत्ता व्यवहार प्रकरणीही नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
  • त्यानंतर मलिक कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि इतर नेत्यांशी संपर्क साधला. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी मलिकांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं.
  • मलिक यांची सकाळपासून दुपारी तीनपर्यंत कसून चौकशी करण्यात आली.
  • त्यानंतर त्यांना अटक दाखवण्यात आली.
  • नियमानुसार त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे.

मलिकांच्या ईडी पिडेमागे दाऊद इब्राहिम प्रकरण

  • जगातील सर्वात मोठा वॉन्टेड दहशतवादी आणि माफिया डॉन दाऊद इब्राहिम कट कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एनआयएला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
  • एनआयएकडून त्या आरोपाखाली दाऊद आणि निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
  • एनआयएच्या एफआयआरच्या आधारावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.
  • मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती.
  • ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली.
  • दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची ईडीकडून चौकशी करण्यात आली.
  • इक्बाल कासकर गुंडांचा वापर करून दाऊदसाठी पैसे वसूल करत असल्याचे पुरावे ईडीला मिळाल्याची माहिती आहे.
  • इक्बाल कासकरने एक फ्लॅट आणि ९० लाख रुपये बेकायदा जमवले असेही ईडीच्या चौकशीत समोर आले.
  • या चौकशीत इक्बाल कासकर याने एका जमीन व्यवहाराशी संबंधित जबाब दिल्याचं कळतं. ज्यात नवाब मलिक यांच्याकडे इशारा आहे.
  • दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे.

इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी

  • अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली.
  • अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.
  • याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती.
  • शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं.
  • यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

 

हेही वाचा:

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”


Tags: EDNawab Malikईडीकाँग्रेसनवाब मलिक
Previous Post

मलिकांमागे ईडी पिडा: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते माजिद मेमन यांचा दिल्लीतील पत्रकार परिषदेत आरोप, भाजपाकडून यंत्रणेचा गैरवापर!कायद्याचा हवाला!!

Next Post

नागपूरमध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

Next Post
Azadi Amrut Mahotsav

नागपूरमध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!