मुक्तपीठ टीम
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अखेर ईडीने अटक केली आहे. आज पहाटे साडेचार वाजता ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी पोहचलं. सीआयएसएफ जवानांसोबत तिथं पोहचलेल्या ईडीच्या पथकानं त्यांना सोबत घेऊन ईडीच्या कार्यालयात नेलं. त्यानंतर त्यांची माफिया डॉन दाऊद इब्राहिमविरोधातील मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. तीनच्या नंतर त्यांना ईडी कार्यालयाबाहेर आणण्यात आल्यानंतर त्यांनी “लढणार आणि जिंकणार” अशी प्रतिक्रिया दिल्याचे कळते. ईडीकडून अटकेनंतर नियमानुसार त्यांना आरोग्य तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मलिकांना अटक का?
- पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे पथक सीआयएसएफ जवानांच्या सुरक्षेसह मलिकांच्या घरी पोहचले.
- डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे.
- मलिक यांना सकाळी ७ वाजल्यापासून मुंबईच्या ईडी कार्यालयात आणले आहे.
- माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात मलिकांची चौकशी सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे.
- किरीट सोमय्यांनी तसं ट्वीटही केले.
- त्याचबरोबर बॉँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी केलेल्या मालमत्ता व्यवहार प्रकरणीही नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
- त्यानंतर मलिक कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि इतर नेत्यांशी संपर्क साधला. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी मलिकांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं.
- मलिक यांची सकाळपासून दुपारी तीनपर्यंत कसून चौकशी करण्यात आली.
- त्यानंतर त्यांना अटक दाखवण्यात आली.
- नियमानुसार त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मलिकांच्या ईडी पिडेमागे दाऊद इब्राहिम प्रकरण
- जगातील सर्वात मोठा वॉन्टेड दहशतवादी आणि माफिया डॉन दाऊद इब्राहिम कट कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एनआयएला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
- एनआयएकडून त्या आरोपाखाली दाऊद आणि निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
- एनआयएच्या एफआयआरच्या आधारावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती.
- ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते.
- केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली.
- दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची ईडीकडून चौकशी करण्यात आली.
- इक्बाल कासकर गुंडांचा वापर करून दाऊदसाठी पैसे वसूल करत असल्याचे पुरावे ईडीला मिळाल्याची माहिती आहे.
- इक्बाल कासकरने एक फ्लॅट आणि ९० लाख रुपये बेकायदा जमवले असेही ईडीच्या चौकशीत समोर आले.
- या चौकशीत इक्बाल कासकर याने एका जमीन व्यवहाराशी संबंधित जबाब दिल्याचं कळतं. ज्यात नवाब मलिक यांच्याकडे इशारा आहे.
- दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे.
इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली.
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.
- याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती.
- शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं.
- यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा:
मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”
मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”