मुक्तपीठ टीम
हिवाळा हा एक ऋतू आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थंड हवामानामुळे शरीराचे तापमान कमी होते आणि शरीराला नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी थर्मोरेग्युलेशन होते. कधीकधी हे संक्रमण हिवाळ्यातील अनेक रोगांद्वारे दिसून येते. हिवाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर काही डाएट टिप्स फॉलो करा. हे पदार्थ खा शरीरासाठी ठरू शकतात फायदेशीर…
बदाम
- बदामामध्ये भरपूर पोषक असतात.
- यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिन ई सारखी पोषक तत्वे आहेत.
- हिवाळ्यात रात्री बदाम खाणे फायदेशीर ठरते.
- नियमित सेवन केल्याने शरीर आणि मन सक्रिय राहते.
हळदीचे दूध
- हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.
- गरम दुधात हळद मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- हाडे आणि स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळेल आणि तुम्ही नेहमी निरोगी राहाल.
तुळस
- तुळशीमध्ये जीवाणूरोधक गुणधर्म असल्याने प्राचीन काळापासून ते उपयुक्त ठरले आहे.
- त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, आयर्न आणि झिंक आहे.
आले
- आल्यात थर्मोजेनिक गुणधर्म आहे.
- आले शरीराला उष्णता प्रदान करते.
- हिवाळ्यात अदरकचा चहा प्या.