मुक्तपीठ टीम
सध्याच्या काळात आरोग्याची काळजी आणि त्याची योग्य ठेवण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी योगा, व्यायाम आणि अन्न सेवनावर योग्य नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहो. आता युरिक अॅसिड वाढण्याच्या समस्येने अनेकांना त्रासलेले अनेकदा दिसले असेल. या परिस्थितीत, तीव्र वेदनांसह प्रभावित सांधे हलविण्यास त्रास होऊ शकतो. शरीर जेव्हा प्युरीन्स नावाच्या पदार्थांचे विघटन करते तेव्हा हे अॅसिड तयार होते. प्युरिन हे सामान्यतः शरीरात तयार केले जातात आणि विशिष्ट पदार्थ आणि पेयांमध्ये देखील आढळतात. युरिक अॅसिडचे शरीरात प्रमाण वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.
शरीरातील किडनी मूत्राद्वारे यूरिक अॅसिड फिल्टर करत असतात. मात्र, जर आहारात भरपूर प्युरिनचा समावेश केला तर रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढू लागते. या समस्येची वेळीच काळजी घेतली नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, यूरिक अॅसिड वाढण्याची समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हा
युरिक अॅसिड टाळण्यासाठी काही सोपे उपाय
१. तणाव
- काही लोक तणावग्रस्त असतात त्यामुळे त्यांच्या शरिरात यूरिक अॅसिड वाढण्याची शक्यता जास्त असते.
- तणावाच्या स्थितीचा त्यावर थेट परिणाम होत नाही, मात्र तणाव, निद्रानाश आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात जळजळ वाढते.
- जळजळ हे यूरिक अॅसिड वाढवणाऱ्या घटकांपैकी एक मानले जाते.
- ताणतणावांवर मर्यादा घालून, यूरिक ऍसिडसह इतर अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवता येते.
२. आहारातील प्रथिने कमी करा
- प्रथिनांचे सेवन शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असले तरी, त्याचा अतिरेक शरीरात यूरिक अॅसिड वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो.
- जास्त प्रथिनेयुक्त आहामुळे मूत्रात यूरिक अॅसिडचे उत्सर्जन वाढवते. याशिवाय सर्व लोकांनी प्युरीन असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे.
- काही प्रकारचे मांस, सीफूड आणि फुलकोबी, हिरवे वाटाणे, सोयाबीन आणि मशरूममध्ये प्युरीन्स जास्त असू शकतात.
३. साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण
- जास्त साखर असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्यामध्ये मधुमेहाचा धोका तर वाढतोच पण युरिक अॅसिडचे प्रमाण वाढवणारा घटकही वाढतो.
- गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्याने देखील यूरिक अॅसिड वाढण्याचा धोका वाढू शकतो.
- प्रक्रिया केलेले आणि साठवून ठेवलेले खाद्यपदार्थही तुमच्या समस्या वाढवू शकतात, त्यांच्यापासूनही दूर ठेवले पाहिजे.
युरिक अॅसिडपासून मुक्ततेसाठी पाणी पिणे फार महत्वाचे
- आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जे यूरिक अॅसिड वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत किंवा ज्यांना त्याचा धोका जास्त आहे, त्यांच्यासाठी पाणी पिणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असू शकतो.
- जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेतल्याने मूत्रपिंडांना यूरिक ऍसिड जलदपणे बाहेर काढणे सोपे होते.
- दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.
- वेळोवेळी काही घोट पाणी पिण्याची सवय लावून तुम्ही अनेक प्रकारच्या समस्या दूर ठेवू शकता.