मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करते. ट्रेनमधील प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, स्टेशनवर तिकीट काउंटर, तसेच एजंटद्वारे तिकीट बुकिंगपर्यंतची सुविधा आहे. आयआरसीटीवर अनेक सेवा उपलब्ध आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे तिकिट बुक केल्यानंतर बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी आहे. याचा अर्थ असा की, बोर्डिंग स्टेशन घरबसल्या ऑनलाइन बदलताही येतं.
तिकीट बुक केल्यानंतर, जाण्याचं स्टेशन बदलण्यासाठी सोप्या स्टेप्स…
- सर्वप्रथम आयआरसीटी वेबसाइटला भेट देऊन लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- त्यानंतर लॉग इन केल्यानंतर My Transactions विभागात जा. त्यानंतर बुकिंग तिकीट हिस्ट्रीवर क्लिक करा.
- यानंतर तुम्ही थेट बुक केलेल्या रेल्वे तिकीट पृष्ठावर पोहोचाल. येथे ती ट्रेन निवडावी लागेल ज्यासाठी तुम्हाला बोर्डिंग स्टेशन बदलायचे आहे.
- ट्रेन निवडण्यापूर्वी नीट तपासा. त्यानंतर Change Boarding Point वर क्लिक करा.
- हे केल्यानंतर एक पॉप-अप विंडो उघडेल. यामध्ये ट्रेनच्या वेळापत्रकासाठी सर्व स्थानकांची यादी दिली जाईल.
- ड्रॉप डाउन मेनूमधील चेंज बोर्डिंग स्टेशन विभागात जा आणि नवीन बोर्डिंग स्टेशन निवडा. नंतर ओकेवर क्लिक करा.
- हे केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल.
बोर्डिंग स्टेशन बदलण्यापूर्वीच्या महत्त्वाच्या सूचना
- बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी ऑनलाइन तिकीट असणे आवश्यक आहे.
- ट्रेन सुटण्याच्या २४ तासांपूर्वीच हे करता येते.
- बदल एकदाच होऊ शकतो.
- ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट बुक केल्यास ही सुविधा मिळणार नाही.
- PNR आणि Vikalp पर्यायासाठी बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा नाही.