मुक्तपीठ टीम
इटालियन सुपरबाइक निर्माता कंपनी डुकाटी यावर्षी भारतीय बाजारपेठेत आपल्या ११ नवीन सुपरबाइक लाँच करणार आहे. यामध्ये मल्टीस्ट्राडा व्ही२, मल्टीस्ट्राडा व्ही४ पाइक्स पीक, स्ट्रीटफायटर व्ही४ एसपी, माय२२ पॅनिगेल व्ही४ आणि एक्स यांचा समावेश आहे.
डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्रा म्हणाले की, “आम्ही २०२१ च्या सुरुवातीला १५ नवीन मॉडेल्स लाँच करण्याचे आश्वासन दिले होते. ऑटो क्षेत्रासाठी कठीण वर्ष असूनही, आम्ही ते वचन पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहोत. ते पुढे म्हणाले की, जागतिक स्तरावर, २०२१ची तिसरी तिमाही डुकाटीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट होती आणि २०२०च्या समान कालावधीत ३ टक्के आणि २०१९च्या तुलनेत २५ टक्के वाढ झाली.”
डुकाटीची कारकीर्द आणि भविष्यातील लाँचिंगविषयीची योजना
- डुकाटीने विशेषत: गेल्या दोन वर्षांत बाजारपेठेत आपली क्षमता वाढवली आहे.
- आता पुन्हा एकदा बॅक-टू-बॅक लाँचसाठी डुकाटी सज्ज झाली आहे.
- कंपनीने सांगितले की २०२२ च्या पहिल्या तिमाहीची सुरुवात स्क्रॅंबलर ११०० ट्रिब्यूट प्रो, त्यानंतर पॅनिगेल व्ही२ बेलिस एडिशनच्या लाँचने होईल.
- यानंतर, मल्टीस्ट्राडा व्ही२ वजनात किंचित घट करून भारतात येईल. याशिवाय, इंजिनचा पुनर्विकास अपडेट्सवर केंद्रित केला जाईल.
- यानंतर, ऑल-न्यू ८०० अर्बन मोटर्ड भारतात लॉन्च केले जाईल.
दुकाटीने सांगितले की, २०२२ मध्ये, पॅनिगेल व्ही४एसपी चे नवीन मॉडेल आणि ऑल-न्यू डुकाटी डेजर्टएक्स लाँच केले जाईल, जी २१-इंच फ्रंट व्हील असलेली पहिली डुकाटी मोटरसायकल आहे, असे कंपनीने म्हटले आहे.