Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

UPSC पूर्व प्रशिक्षणाकरिता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करा, ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारीला!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
upsc

मुक्तपीठ टीम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ९ डिसेंबर २०२१ पासून करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार, १६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ०१ या वेळेत घेण्यात येणार आहे, असे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्रे नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व कोल्हापूर येथील प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून www.siac.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) अर्ज मागवण्यात येत आहेत.

 

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना सन १९७६ साली झाली असून महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांचा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत टक्का वाढावा या उदात्त हेतूने करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. सन १९७६ पासून आजतागायत संस्थेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे व संस्थेत प्रशिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी देशातील वेगवेगळ्या राज्यात व परदेशात देखील भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत,अशी माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ.खुशपत जैन यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: careerCivil Service Examination 2022Online Entrance ExamPre-TrainingsiacUPSCऑनलाईन प्रवेश परीक्षाकरिअरसंधीकेंद्रीय लोकसेवा आयोगकेंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२२चांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपूर्व प्रशिक्षणमुक्तपीठयूपीएससी
Previous Post

लोकलचालकाची सतर्कता! रुळावरील माणसाला अर्जंट ब्रेक मारून वाचवले!

Next Post

धम्मालच! नव्या वर्षात डुकाटीच्या ११ सुपरबाइक भारतात होणार लाँच!!

Next Post
Ducati

धम्मालच! नव्या वर्षात डुकाटीच्या ११ सुपरबाइक भारतात होणार लाँच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!