मुक्तपीठ टीम
इटालियन सुपरबाइक कंपनी डुकाटीने भारतात मल्टीस्ट्राडा व्ही२ सीरिजच्या मोटारसायकल लाँच केल्या आहेत. भारतात त्यांची शोरूम किंमत १५ लाख रुपयांपासून सुरू होईल. मल्टीस्ट्राडा व्ही२ भारतातील डुकाटी डीलरशिपवर उपलब्ध आहे, ज्याची किंमत १५ लाख रुपये आहे. त्याच वेळी, मल्टीस्ट्राडा व्ही२ ची शोरूम किंमत १७ लाख रुपये आहे.
डुकाटी सुपरबाइक्सच्या किंमती १५ लाखांपासून सुरू
- इटालियन सुपरबाइक कंपनी डुकाटीने आपल्या मल्टीस्ट्राडा व्ही२ सीरिजच्या मोटारसायकली भारतात आणण्याची घोषणा केली आहे.
- भारतात त्यांची शोरूम किंमत १५ लाख रुपयांपासून सुरू होईल.
- कंपनीने म्हटले आहे की ‘मल्टीस्ट्राडा व्ही२’ भारतातील डुकाटी डीलरशिपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्याची किंमत १५ लाख रुपये आहे.
- त्याच वेळी, ‘मल्टीस्ट्राडा व्ही२एस’ ची शोरूम किंमत १७ लाख रुपये आहे.
‘या’ शहरांमध्ये बुकिंग सुरू आहे
- नवीन बाइकचे बुकिंग दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू, कोचीसह कोलकाता आणि चेन्नई येथील सर्व डुकाटी डीलरशिपवर सुरू झाले आहे.
- या रेंजच्या मोटर सायकलींचा पुरवठाही तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
- डुकाटी मल्टीस्ट्राडा व्ही२ची किंमत १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर मल्टीस्ट्राडा व्ही२ एसची शोरूम किंमत १७ लाख रुपये आहे.
कशी आहे डुकाटीची मल्टीस्ट्राडा व्ही२?
- “मल्टीस्ट्राडा व्ही२ हे अगदी नवीन मॉडेल आहे.
- हे अनेक सुविधांनी सुसज्ज आहे.
- यासोबतच ट्विन सिलेंडर इंजिनही देण्यात आले आहे.
- यात स्पोर्ट, टूरिंग, अर्बन आणि एंडुरो असे चार राइडिंग मोड देखील मिळतात.
- मल्टीस्ट्राडा व्ही२ लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायक आहे.
- २०१० मध्ये सादर करण्यात आलेली मल्टीस्ट्राडा ही रायडिंग मोडसह सुसज्ज असलेली जगातील पहिली मोटरसायकल असल्याचे त्यांनी सांगितले.”
पाहा व्हिडीओ: