Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ड्रग्सची बेकरी, ड्रग्सवाली केक-पेस्ट्री आणि बर्थडेची ड्रग पार्टी!

सुशांतनंतरही बॉलिवूड सुधारत नाही

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Drugs

मुक्तपीठ टीम

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणातील जीवघेणा अँगल समोर आला. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने सुरू असलेली कारवाई अद्यापही सुरूच आहे. एनसीबीने गेल्या आठवड्यात केलेल्या दोन कारवाईंमधून ड्रग्सच्या काळ्या धंद्याचे झगमगाटाशी असलेले नातं उघड झालं आहे. पहिली कारवाई एका बेकरीविरोधीत, जिथे केक आणि पेस्ट्रीत ड्रग्स लपवून पुरवले जात होते. तर दुसऱ्या कारवाईत बॉलिवूडमधील एका संघर्षशील अभिनेत्रीच्या बर्थ डे पार्टीवर धाड घातली असता ती प्रत्यक्षात ड्रग पार्टी असल्याचं उघड झालं आहे.

 

दाखवायला बेकरी, ड्ग्सवाली केक, पेस्ट्री!

  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) मुंबईतील मालाड परिसरातील बेकरीवर छापा टाकून बेकरीत बनवण्यात येणाऱ्या केक आणि पेस्ट्रीत ड्रग्ज लपवून सप्लाय करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे.
  • एनसीबीने या प्रकरणात बेकरीच्या मालकासह ३ जणांना अटक देखील केली आहे.
  • बेकरीच्या माध्यमातून असे ड्रग रॅकेट उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले की, बेकरीत केक आणि पेस्ट्रीत ड्रग्स लपवून सप्लाय होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली.
  • यानंतर रविवारी ‘बेक द बेकर्स’ नावाच्या बेकरीवर छापा टाकण्यात आला आणि येथून १६० ग्रॅम गांजाही जप्त करण्यात आला.
  • केकमध्ये ड्रग्ज भरून हायप्रोफाईल परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
  • कोणत्या आयटममध्ये, किती औषधे मिसळावीत, ही जबाबदारी २० वर्षांच्या मुलीची होती. तिला अटकही करण्यात आली आहे.

 

एका अभिनेत्रीची ड्रग्स पार्टी

  • एका अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पार्टीत ड्रग्स घेणे चांगलेच महागात पडले आहे.
  • अभिनेत्री नायरा शाह आणि तिचा मित्र आशिद साजिद हुसेनला अटक करण्यात आली आहे.
  • नायराने तेलुगू चित्रपट मिरुगा, बुर्रा कथा आणि ई-ई या चित्रपटात काम केले आहे.
  • सांताक्रूझ पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी अभिनेत्री नायर शहाचा वाढदिवस होता आणि ती हॉटेलच्या एका खोलीत आपल्या दोन मित्रांसह पार्टी करत होती.
  • हॉटेलच्या खोलीत ड्रग पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर छापा टाकून अभिनेत्रीला चरस सिगारेटसह अटक करण्यात आली.

 

सांताक्रूझ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक झाल्यानंतर दोघांनाही सोमवारी दुपारी स्थानिक वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने जामिनावर सोडले आहे. गोव्यातील आणखी एक व्यक्ती जो त्यांच्यासोबत होता तो छापा टाकल्यानंतर तेथून फरार झाला. सध्या त्याचा शोधही सुरू आहे.

 

हिटलरच्या चरित्रातून जप्त केले ड्रग्स

  • एप्रिलमध्ये एनसीबीने अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या चरित्रात लपलेल्या ड्रग्सचा साठा जप्त केला होता.
  • पुस्तकाच्या मध्यभागी लपवून ही औषधे युरोपमधून भारतात पाठविली जात होती.
  • पुस्तकाची तपासणी केल्यावर एलएसडीच्या ८० बोल्ट्सची मात्रा जप्त करण्यात आली.
  • एलएसडी काही युरोपियन देशांमधील काही तरुणांनी डार्क नेटद्वारे विकत घेतले होते आणि बिटकॉइन सारख्या क्रिप्टो चलनांद्वारे याचे पेमेंट केले गेले.

Tags: Drugsएनसीबीड्रग पार्टीड्रग्सनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो
Previous Post

जगाला पिडणाऱ्या कंगनामागेच आता संकटांची मालिका! वाचा कधी, कुठे, कशी…

Next Post

कोरोना संकटात एक आधार असणाऱ्या आशा सेविका आजपासून का संपावर?

Next Post
Asha worker

कोरोना संकटात एक आधार असणाऱ्या आशा सेविका आजपासून का संपावर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!