Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख

September 20, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Akola. Panjabrao Deshmukh Agricultural University

मुक्तपीठ टीम

राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शरद रामराव गडाख यांची अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. गडाख यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ. गडाख यांची नियुक्ती पाच वर्षांकरिता किंवा ते वयाची ६५ वर्ष पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर येईल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.

डॉ. गडाख (जन्म २९ नोव्हें  १९६१) यांनी राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून वनस्पती शरीर विज्ञान विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन,  प्रशासन व विस्तार कार्याचा व्यापक अनुभव आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी संपल्यानंतर कुलगुरुपद रिक्त झाले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक प्रो. एस. अय्यप्पन यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह व कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे समितीचे सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. गडाख यांच्या नियुक्तीची घोषणा केली.


Tags: Akola. Panjabrao Deshmukh Agricultural UniversityGovernment NewsmuktpeethRahuri Mahatma Phule Agricultural UniversityResearch Director Dr. Dr. Sharad Ramrao GadakhVice-Chancellorअकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठकुलगुरूपदघडलं-बिघडलंमुक्तपीठराहूरी महात्मा फुले कृषि विद्यापीठसरकारी बातमीसंशोधन संचालक डॉ. शरद रामराव गडाख
Previous Post

आधी शिष्य आणि आता गुरु! संजय राऊतांनंतर आता भाजपाचं लक्ष्य शरद पवार!

Next Post

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
Pradhan Mantri Krishi Irrigation Scheme

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!