Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधी शिष्य आणि आता गुरु! संजय राऊतांनंतर आता भाजपाचं लक्ष्य शरद पवार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp target sharad pawar

मुक्तपीठ टीम

येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्याआधी भाजपा महाराष्ट्रात अनेक लक्ष्य साध्य करण्याच्या तयारीत दिसत आहे. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांची ईडी कोठडी सातत्यानं वाढत असतानाच दाखल झालेलं आरोपपत्र त्यांना अधिकच गुंतवणारं दिसत आहे. एकीकडे संजय राऊतांचा कोठ़डीतील मुक्काम वाढवण्याची तजविज दिसत असतानाच दुसरीकडे ते ज्यांना बाळासाहेबांएवढेच मानतात त्या शरद पवारांनाही भाजपाने लक्ष्य करण्याचे ठरवल्याचं दिसत आहे. ईडीच्या आरोपपत्रात नावांचा थेट उल्लेख नसला तरी भाजपाचे कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांच्या थेट चौकशीची मागणी केली आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात दाखल आरोपपत्रात ईडीने आणखीही अतिरिक्त माहिती दिली आहे. त्यामुळे त्यावरून राजकारण सुरु झाले आहे. ईडीच्या आरोपपत्रानुसार, २००६-२००७ च्या दरम्यान पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या बैठकांना संजय राऊत होतेच पण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हेही उपस्थित होते. त्यांच्या नावाचा उल्लेख ईडीने आपल्या आरोपपत्रात केलेला नसला, तरी त्या कालखंडात शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री आणि विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते.

ईडीच्या पत्राचाळ आरोपपत्रात खळबळजनक दावे

  • ईडीने आरोपपत्रातून खळबळनक माहिती दिली आहे.
  • पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती.
  • या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आलं होतं.
  • या सर्व घडामोडींची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांना माहिती होती, असा ईडीचा दावा आहे.
  • त्यानंतर यामध्ये एक हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं आरोपत्रात म्हटलं आहे.

संजय राऊत हेच पत्रा चाळ घोटाळ्याचे मास्टरमाइंड

  • संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा ईडीने केला आहे.
  • प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे विश्वासू होते म्हणून त्यांना गुरु आशिष कंपनीत घेण्यात आले.
  • गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊत यांचा २५ टक्के हिस्सा होता.
  • प्रवीण राऊत हे फक्त एक मुखवटा होते, प्रत्यक्षात ते सर्व काही संजय राऊत यांच्या नियंत्रणाखाली करत असत.
  • प्रवीण राऊत यांच्याकडे कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार होते.
  • त्यांना म्हाडाशी वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी, निमशासकीय, वैधानिक आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क साधण्याचे काम होते.
  • संजय राऊत यांचा संपर्क वापरत प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला, नंतर एफएसआय बिल्डरला विकला.
  • याप्रकरणात राकेश वाधवान, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचं संगनमत होते.

Tags: BJPEDMaharashtrasanjay rautsharad pawarईडीभाजपामहाराष्ट्रशरद पवारसंजय राऊत
Previous Post

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख

Next Post
Akola. Panjabrao Deshmukh Agricultural University

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!