Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामाजिक सहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रे माता-बालस्नेही होण्यासाठी पथदर्शी प्रकल्प

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंचा प्रकल्प सुरु करण्यासाठी पुढाकार घेणार

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Dr. Neelam Gorhe

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भविष्यात माता-बालकांच्या आरोग्याचा धोका टाळण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना सक्षम करून माता-बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र हा उपक्रम राबविण्यात यावा. आरोग्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी स्थानिक भागातील तरूणांना सहभागी करून आरोग्य मित्र ही संकल्पना राबवावी. त्यांना आरोग्याबाबत विशेष प्रशिक्षण द्यावे व त्या भागातील नागरिकांत आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

 

विधानभवन येथे ‘माता-बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्रसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातील विधीमंडळ सदस्यांशी चर्चा केली. या बैठकीस ठाणे जिल्ह्यातून आमदार रविंद्र फाटक, भिवंडी येथून शांताराम मोरे, उस्मानाबाद येथून कैलास पाटील, औरंगाबाद येथून उदयसिंह राजपुत, नाशिक येथून नरेंद्र दराडे यासह संपर्क या स्वयंसेवी संस्थेच्या विश्वस्त मेधा कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख मृणालिनी जोग उपस्थित होत्या.

 

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, ग्रामीण भागातील माता आणि बालकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी तसेच आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या उपक्रमाचा लाभ होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद सदस्य व या उपक्रमासाठी प्रशिक्षित मुले/मुली यांची याबाबत एकत्रीत बैठक घ्यावी. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी संबंधित पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी दीड लाख रूपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

 

विधीमंडळ सदस्यांनी जिल्हा प्रशासन व प्राथमिक आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केलेल्या गावांमधून आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि तरूणांची माता -बाल स्नेही प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वयंसेवक म्हणून निवड करावी. तसेच त्यांना आरोग्य मित्र म्हणून संबोधण्यात यावे. आरोग्यासंदर्भात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी या स्वयंसेवकांना स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या सहायाने बालकांचे कुपोषण, महिलांचे आरोग्य, बालक जन्माला आल्यानंतर त्याच्या आहारासंदर्भात घ्यावयाची काळजी यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात यावे, असेही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.


Tags: Deputy Speaker Dr. Neelam GorheGood news MorningMother-child health centermuktpeethPrimary Health Centerrural areasSocial participationउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेकोरोनागुड न्यूज मॉर्निंगग्रामीण भागपथदर्शी प्रकल्पप्राथमिक आरोग्य केंद्रमाता-बालस्नेही केंद्रमुक्तपीठसामाजिक सहभाग
Previous Post

सरकार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करणार आणि आणणार ‘वर्क फ्रॉम होम’ कायदा!

Next Post

जीमेल अॅपवर मिळणार आता व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलची सुविधा!

Next Post
gmail

जीमेल अॅपवर मिळणार आता व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलची सुविधा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!