Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकल महिलांच्या मालमत्तांवरील वारस नोंदीबाबत माहिती उपलब्ध करून द्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

March 25, 2022
in सरकारी बातम्या
0
Dr Neelam Gorhe

मुक्तपीठ टीम

एकल महिलांच्या मालमत्तांवरील वारस नोंद, विवाह नोंदणी अधिनियमाची अंमलबजावणी व आकारी पड जमिनीचे पुन:वाटप याबाबत संबंधिताना विविध माध्यामातून माहिती उपलब्ध करून द्यावी अशी सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली.

           

एकल महिला व अनाथ बालके यांच्या मालमत्तांवरील वारस नोंद, विवाह नोंदणी अधिनियमाची अंमलबजावणी व आकारी पड जमिनीचे पुन:वाटप या विषयासंदर्भात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे बैठक झाली. या बैठकीस महसूल विभागाचे  अतिरिक्त मुख्य सचिव, नितीन करीर, ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाडे आदी उपस्थित होते.

            

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, आर्थिक अडचणींमुळे शेत जमिनीचा महसूल भरू न  शकलेल्या  शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाच्या ताब्यात आहेत. या आकारी पड जमिनीच्या पुन:वाटपाबाबत सद्यस्थितीबाबत आढावा  डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. बऱ्याच कायद्यांची लोकांना माहिती नसते. अचूक माहिती न मिळाल्यामुळे वर्षानुवर्ष लोकांचे प्रश्न प्रलंबित राहतात, त्यांना अचूक व वेळवर कायद्याची माहिती होण्यासाठी शासकीय यंत्रणानी प्रयत्न करावे.

            

कोरोनामुळे निधन झालेल्या लोकांची यादी जिल्हानिहाय उपलब्ध आहे. त्यानुसार विधवा महिलांची संख्या किती आहे तसेच किती एकल महिलांनी मालमत्तांवरील वारस नोंदीसाठी अर्ज केला आहे, यासंदर्भातील यादी संबंधितानी द्यावी. ज्या महिलांनी अर्ज दाखल केले नाहीत त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी मदतीची यंत्रणा तयार करावी. एकल महिलांच्या मालमत्तांवरील वारस नोंदीची मोहिम राबविण्याबाबत त्याचबरोबर कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्यादृष्टीने आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी विशेष समाधान शिबीर संपूर्ण राज्यात तालुकास्तरावर आयोजित करण्यात यावीत, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

            

विवाह नोंदणी अधिनियम अंमलबजावणीबाबत संदर्भात कोरो या संस्थेने तयार केलेला अहवाल यावेळी सादर केला. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत कोरो संस्थेने केलेल्या सर्वेक्षण अहवालात विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळी फी आकारली जाते किंवा कागदपत्रे मागितली जातात असे दिसून असून आले आहे. विवाह नोंदणीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नगर विकास व ग्रामविकास विभागाने एक परिपत्रक निर्गमित करावे अशा सूचना यांनी यावेळी डॉ.गोऱ्हे दिल्या.


Tags: Dr.Neelam Gorheअनाथ बालकउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेएकल महिला
Previous Post

शनिवारपासून सलग चार दिवस बँका बंद!

Next Post

#मुक्तपीठ LiVE मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधानसभेत रोखठोक भाषण…ऐका कोणाला काय सुनावलं!

Next Post
#मुक्तपीठ LiVE  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधानसभेत रोखठोक भाषण…ऐका कोणाला काय सुनावलं!

#मुक्तपीठ LiVE मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधानसभेत रोखठोक भाषण...ऐका कोणाला काय सुनावलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!