Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘महाबीज’साठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक न नेमल्यास ठिय्या आंदोलन

किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा इशारा

August 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
Dr anil bonde

मुक्तपीठ टीम

शेतकऱ्यांचे महामंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र बियाणे महामंडळ तथा ‘महाबीज’ ला महाविकास आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या २ वर्षापासून या महामंडळाला पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालक नसल्यामुळे महाबीजचे काम रखडले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. या महामंडळावर ७ दिवसांच्या आत पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक न नेमल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

 

डॉ. बोंडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे यासाठी महाबीजची स्थापना करण्यात आली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत ‘महाबीज’द्वारे सोयाबीन, चना, तूर, कांदा यांची गुणवत्तापूर्ण बियाणे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बाजारामधून उपलब्ध होत होती. महाबीज हा शासनाचा उपक्रम असला तरी हे महामंडळ सातत्याने नफ्यात राहत होते. या महाबीजच्या द्वारे विदर्भातील ६४ तालुक्यामध्ये अनेक शेतकरी, उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे गट बीज उत्पादन करित होते. त्यामुळे बीज उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना खात्रीचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत होते.

 

सोयाबीनच्या बियाणाकरिता बाजारपेठेमधील ५०% ते ६५% पर्यंतचा वाटा महाबीजचा होता. परंतु यावर्षी १६ लाख क्विंटल पैकी फक्त १.५ लाख क्विंटल बियाणे महाबीज कडून पुरविले गेले. शेतकऱ्यांना खाजगी कंपन्याकडून बियाणे घ्यावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमणात फसवणूक व लुट झाली.

 

महाबीजला २ वर्षापासून पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालक नाही. त्यामुळे बियाणे खरेदी व विक्रीबाबत ठोस निर्णय होत नाही. ‘महाबीज’ला जाणीवपूर्वक कमकुवत करून महाविकास आघाडी सरकारने खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांचा फायदा करून दिला. त्यामुळे शासनाने ७ दिवसाच्या आत पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नेमावा अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल असेही डॉ. बोंडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 

 


Tags: Dr Anil bondefarmersकिसान मोर्चाडॉ. अनिल बोंडेमहाबीजमहाविकास आघाडी सरकारसोयाबीन
Previous Post

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे आदेश

Next Post

“काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली!”: नाना पटोले

Next Post
nana patole - pm modi

"काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!