Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली!”: नाना पटोले

August 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole - pm modi

मुक्तपीठ टीम

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद केल्यानंतर आता अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षासह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ट्विटर खाती बंद करण्यात आली आहेत. ट्विटरची ही कारवाई पक्षपातीपणाची असून केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारणारे ट्वीट करून जेरीस आणल्यामुळेच मोदी सरकारच्या दबावाखाली ट्विटरने ही कारवाई केली आहे. या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून कोणत्याही दबावापुढे न झुकता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आवाज उठवतच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 

ट्विटरच्या कारवाईवर बोलताना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार लोकशाही व्यवस्था व संविधानाला न जुमानत हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून केंद्र सरकारच्या विरोधातील प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न मगील ७ वर्षापासून सातत्याने केला जात आहे. संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. अन्याय, अत्याचार दिसेल त्याविरोधात आम्ही आवाज उठवत आलो आहोत व यापुढेही आवाज उठवत राहु. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अन्यायी कारभाराचे वाभाडे काढत होते तेच त्यांना अडचणीचे ठरल्याने कारवाई केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार समाजात तेढ निर्माण करणारे, फुट पाडणारे, देशविघातक संदेश ट्विटरवरून देत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत ट्विटर करत नाही मात्र थातुरमातूर कारणे देऊन काँग्रेसच्या शेकडो ट्विटर खात्यांवर कारवाई करण्यात आली हा पक्षपातीपणा आहे.

 

ट्विटरने अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष, मुंबई काँग्रेस, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, जितेंद्र सिंह, महिला काँग्रेसच्या सुष्मिता देव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस व सोशल मीडियाचे अभिजित सपकाळ यांच्यासह काँग्रेसची शेकडो खाती बंद केली आहेत. ट्विटरने कितीही खाती बंद केली तरी संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यापासून कोणीही रोखू करु शकत नाही, असेही पटोले म्हणाले.

 

 


Tags: Congressprime minister narendra moditwitterनाना पटोलेबाळासाहेब थोरातभाई जगतापमुंबई काँग्रेसराहुल गांधी
Previous Post

‘महाबीज’साठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक न नेमल्यास ठिय्या आंदोलन

Next Post

सतत चार दिवस बरे होणारे रुग्ण जास्त! आज ६,३८८ नवे रुग्ण, तर ८,३९० बरे झाले!

Next Post
MCR 4-8-21

सतत चार दिवस बरे होणारे रुग्ण जास्त! आज ६,३८८ नवे रुग्ण, तर ८,३९० बरे झाले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!