Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: घरोघरी तिरंगा ध्वज फडकवताना काय करावं, काय करु नये?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Har Ghar tiranga

मुक्तपीठ टीम

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविणेत येत आहे. भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव हा सर्व भारतीय नागरीकांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि राष्ट्रासाठी गौरवाचा आहे. पण त्याच वेळी घरोघरी तिरंगा फडकवताना काय करावं आणि काय करु नये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

“घरोघरी” उपक्रम अंमलबजावणीकरिता मार्गदर्शक सूचना

काय करावे?

  • ध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क /खादीपासून बनविलेल्या कपड्याचे असावे.
  • विभाग / कार्यालय प्रमुख/नागरीक यांनी आपले कार्यालयावर/घरावर दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ध्वज फडकवावा.
  • ज्या ज्या ठिकाणी ध्वज उभारतात अशा प्रत्येक ठिकाणी तो उच्च स्थानी आणि स्पष्टसपणे दिसेल अशा रितीने लावला पाहिजे.
  • दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वज सुर्योदयावेळी फडकवावा व सुर्यास्तावेळी उतरवावा याबाबत कार्यालयांना ध्वज संहिता पाळावी लागेल.
  • घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवयाची आवश्यकता नाही.
  • ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकउे असावी. ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • ध्वज उतरविल्यानंतर त्यांची व्यवस्थित घडी घालून तो कपाटात ठेवावा.
  • सर्व अधिकृत समारंभात लावला जाणारा ध्वज हा भारतीय मानक कार्यालयाच्या निकषानुसार व त्यांचे बोधचिन्ह असलेलाच असेल.
  • हर घर तिरंगा बाबत फोटो व माहिती अपलोड करण्यासाठी १. https://amritmahotsav.nic.in व २. https://mahaamrut.org/ या लिंकचा वापर करावा.
  • जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथील sangliweb@gmail.com यावरही माहिती व फोटो पाठविणेत यावेत.

काय करू नये?

  • प्ला‍स्टिकच्या ध्वजाचा वापर करु नये.
  • ध्वज फाटलेला अथवा चुरगळलेला लावता कामा नये.
  • ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालु नयेत.
  • इतर कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा.
  • ध्वजाचा स्पर्श जमीनीस होऊ देऊ नये अथवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये.
  • ध्वज फाटेल अशा पध्दतीने फडकवू नये अथवा बांधू नये.
  • ध्वज मलीन होईल अशा प्रकारे वापरु नये अथवा ठेवू नये.
  • ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षरे लिहू नयेत.
  • अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये. तो सन्मानाने जतन करुन ठेवावा.

पाहा:


Tags: Ghar Ghar TirangaGood news MorningHar Ghar tirangaगुड न्यूज मॉर्निंगघरोघरी तिरंगास्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
Previous Post

गोव्यात सेंद्रीय खाद्यान्न महोत्सव, मुंबईतील विद्यार्थीही सहभागी आयोजन

Next Post

महिंद्राच्या देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्रीत ३३ टक्क्यांनी वाढ!!

Next Post
33 percent increase in Mahindra's domestic passenger vehicle sales

महिंद्राच्या देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्रीत ३३ टक्क्यांनी वाढ!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!