Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्राच्या देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्रीत ३३ टक्क्यांनी वाढ!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
33 percent increase in Mahindra's domestic passenger vehicle sales

मुक्तपीठ टीम

ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) लिमिटेडची जुलैमध्ये एकूण देशांतर्गत प्रवासी वाहनांची वार्षिक विक्री ३३ टक्क्यांनी वाढून २८,०५३ युनिट्स झाली आहे. कंपनीने एका वर्षापूर्वी याच महिन्यात २१,०४६ युनिट्सची विक्री केली होती.

  • देशांतर्गत उपयोगिता वाहनांची विक्री समीक्षाधीन कालावधीत ३४ टक्क्यांनी वाढून २७,८५४ युनिट्सवर गेली आहे.
  • मागील वर्षीच्या याच महिन्यात २०,७९७ युनिट्स होती.
  • जुलै २०२२ मध्ये कार आणि व्हॅनची विक्री २० टक्क्यांनी घसरून १९९ युनिट्सवर आली आहे.
  • जुलै २०२१ मध्ये २४९ युनिट्सची विक्री झाली.

महिंद्रा अँड महिंद्राच्या मोटार वाहन विभागाचे अध्यक्ष विजय नाकरा यांनी स्पष्ट केले की, कंपनीच्या एक्सयुव्ही ७००, थॉर, बोलेरो आणि एक्सयुव्ही ३०० या ब्रँड्सना जोरदार मागणी आहे. ते म्हणाले की, पुरवठा साखळी स्थिती गतिमान आहे आणि आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. गेल्या महिन्यात व्यावसायिक वाहनांची विक्री १८.५६ टक्क्यांच्या वाढीसह २०,९४६ युनिट्सवर राहिली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात १७,६६६ युनिट्स होती.

  • जुलै २०२१ मध्ये २७,२२९ युनिट्सच्या तुलनेत मागील महिन्यात एकूण ट्रॅक्टर्सची विक्री १४ टक्क्यांनी घसरून २३,३०७ युनिट्सवर आली.
  • देशांतर्गत ट्रॅक्टर्सची विक्री देखील १६ टक्क्यांनी घसरून २१,६८४ युनिट्सवर आली आहे.
  • वर्षभरापूर्वी याच महिन्यात ते २५,७६९ युनिट होते.

पाहा:


Tags: Domestic Vehicles SalesGood news MorningMahindra XUV 300Mahindra's XUV 700 SUVTHARगुड न्यूज मॉर्निंगथारमहिंद्रा अँड महिंद्रा
Previous Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: घरोघरी तिरंगा ध्वज फडकवताना काय करावं, काय करु नये?

Next Post

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये अॅप्रेंटिसशिपच्या ३१ जागांवर संधी

Next Post
IRCON-International-logo-ipo

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये अॅप्रेंटिसशिपच्या ३१ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!