मुक्तपीठ टीम
गुगलने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला प्ले स्टोअरसाठी मान्यता दिली आहे. गुगलने सांगितले की, ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे ट्रुथ सोशल अॅप लवकरच प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. सप्टेंबरमध्ये गुगलने ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल अॅपवर बंदी घातली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरला विरोध करण्यासाठी स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केले. पण प्ले स्टोअरवरून अॅप बॅन केल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता.
प्ले स्टोअरवर पॉलीसीचे उल्लंधन केल्याने TRUTH SOCIAL अॅपवर बंदी!!
- डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रुथ सोशल अॅप फेब्रुवारीमध्ये लॉंच करण्यात आले होते.
- गुगलने म्हटले आहे की त्यांच्या अॅपने प्ले स्टोअरवर पॉलीसीचे उल्लंघन केले आहे.
- या पॉलीसीसाठी प्ले स्टोअरवर आढळणाऱ्या यूजर-जनरेटेड कंटेंटला मॉडरेट करण्यासाठी प्रभावी सिस्टीमची आवश्यकता आहे.
- गुगलने आरोप केला होता की, अॅप फिजिकल धमक्या आणि हिंसेला चिथावणी देणारे कंटेंट सादर करतो. जे नियमांच्या विरुद्ध आहे.
अॅप प्ले स्टोअरवर आणण्यासाठी गुगलच्या अटी कोणत्या?
- गुगलच्या डेव्हलपर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर आणले जाऊ शकतात, असे गुगल प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
- यासाठी, डेव्हलपर यूजरला यूजर जनरेटेड कंटेंटला मॉडरेट करणे आणि आक्षेपार्ह पोस्ट हटवणे आवश्यक आहे.
अॅपलचे अॅप स्टोअर आणि गुगलचे प्ले स्टोअर याशिवाय यूजर्सकडे हे अॅप डाउनलोड करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. अमेरिकेत, प्ले स्टोअर यूजर्ससाठी अॅप्स डाउनलोड करण्याचा मुख्य मार्ग आहे. अँड्रॉईड यूजर्स वेबसाइटवरून थेट अॅप्स डाउनलोड करू शकतात, परंतु अधिक सुरक्षतेसाठी त्यांना यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.