कॅपिटल हिल संसदमधील हिंसाचारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात भारतीय वंशाच्या वकिल विजया गडदे यांचे मोलाचे योगदान होते. हैदराबादमध्ये जन्मलेल्या विजया ट्विटरच्या कायदेशीर, सार्वजनिक धोरण आणि सुरक्षा पथकाच्या प्रमुख आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद केले गेले आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राजधानीत आणीबाणी लागू करण्याचा आदेश दिला आहे. वॉशिंग्टन डीसी मधील आपत्कालीन आदेश सोमवार ते २४ जानेवारी दरम्यान लागू राहील. बायडन हे राष्ट्राध्यक्ष पदाची २० जानेवरी रोजी शपथ घेतील. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस त्यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. येथे एफबीआयने गुप्त माहीतीच्या आधारे वॉशिंग्टन आणि देशातील ५० प्रांतांची राज्यधानींना सशस्त्र प्रात्यक्षिकेचा इशारा दिला आहे.
व्हाईट हाऊसने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतींच्या आदेशानंतर गृह सुरक्षा विभाग आणि फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीला आवश्यकतेनुसार स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एफबीआयने दिलेल्या अहवालात असे सांगितले आहे की, “१६ ते २० जानेवारी दरम्यान सर्व प्रांतांमध्ये सशस्त्र निदर्शने करण्याचे नियोजन आहे. तसेच वॉशिंग्टनमधील संसद संकुलात १७ ते २० जानेवारी दरम्यान प्रात्यक्षिक तयारी होणार आहे. ट्रम्प यांच्या चिथावणीखोरीवरून हजारोंच्या संख्येने समर्थकांनी गेल्या ६ जानेवारीला संसद कॉम्प्लेक्सवर धडक दिली. यावेळी भयंकर तोडफोड आणि गोळीबार झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला.