Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धनंजय मुंडेंवर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

January 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
navab malik

मुक्तपीठ टीम

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनयंज मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर संपूर्ण राजकीय वर्तृळात गदारोळ माजला. या प्रकरणी मुंडे यांनी हे सर्व आरोप खोटे असून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटले आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. मंगळवारी उशिरा रात्री राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे.

 

‘एखादी तक्रार झाली तर त्याची चौकशी होत असते. पण आरोप करणारी महिला त्यांची नातेवाईक आहे. तक्रारदाराच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांनी लग्न केलेले असून, उभयतांना दोन मुलेसुद्धा आहेत. याच्यामागे काय कारण आहे ते चौकशीत सगळे समोर येईल. त्यांची जी बाजू आहे ती निश्चित प्रकारे ते मांडतील. चौकशीनंतरच काय ते समोर येईल. त्यावर फार काही बोलू शकणार नाही,’ असेही नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. मात्र, हे सर्व आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला आहे.

 

तसेच एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली, असे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.


Tags: Nawab MalikNCP leaderSocial Justice Minister Dhanyanj Mundeनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेसामाजिक न्यायमंत्री धनयंज मुंडे
Previous Post

मराठी वकिल महिलेनं दिला ट्रम्पना हादरा! अमेरिकेन अध्यक्षांचं ट्विटर अकाउंट केलं बंद!!

Next Post

सावधान! पुण्याच्या प्रसिद्ध सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेची बनावट वेबसाइट!

Next Post
symboisis college

सावधान! पुण्याच्या प्रसिद्ध सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेची बनावट वेबसाइट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!