मुक्तपीठ टीम
महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना भारतीय तेल कंपन्यांनी दरवाढीचा चटका दिला आहे. आज १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आलेत. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर आता १ हजार ५३ रुपयांना उपलब्ध होईल. तर दिल्लीत आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहोचली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. मात्र, व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आलीय.
Waking up to Amrit Kaal.
LPG cylinder prices hiked by ₹50 per cylinder – 3rd hike in past 2 months.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) July 6, 2022
घरगुती सिलिंडरचे दर
- मुंबईमध्ये घरगुती सिलिंडर आता १ हजार ५३ रुपयांना उपलब्ध होईल.
- दिल्लीत आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहोचली आहे.
- तर कोलकात्यामध्ये हाच दर १ हजार ७९ रुपयांपर्यंत गेलाय. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडर १ हजार ६८ रुपये ५० पैसे इतका असल्याचं इंडियन ऑइल कॉर्परेशनने स्पष्ट केलं आहे.
मे महिन्यात घरगुती सिलिंडरचे दर दोनदा वाढले:
- याआधी मे महिन्यातही घरगुती सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती.
- मे महिन्यात पहिल्यांदा ७ तारखेला घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
- यानंतर १९ मे रोजीही घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर सुमारे १० रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, १९ मे रोजी त्याची किंमत 8 रुपयांनी वाढवण्यात आली.
गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे तृणमूल काँग्रेस आक्रमक!
- गॅस सिलिंडरच्या दरात झालेली ही वाढ गेल्या २ महिन्यातील तिसरी वाढ आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोइना मित्रा यांनी त्यावर टीका केली आहे.