मुक्तपीठ टीम
पती पत्नीचं सात जन्माचं नात, असं नेहमी बोललं जात. मात्र हेच नात एखाद्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतं तेव्हा नात्याला काही अर्थच उरत नाही. पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना टिटवाळा येते घडली आहे. आपल्या मामेभावासोबतचे अनैतिक संबंध स्वीकारण्यासाठी पत्नी आणि तिची आईने डॉक्टरवर मानसिक दबाव आणत होत्या. याच मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टरने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
- टिटवाळा पूर्वेला नारायण रोड परिसरात मोहन हाईट्स या इमारतीत डॉ. अविनाश देशमुख हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते.
- अविनाश यांची पत्नीही डॉक्टर आहे.
- अविनाश हे इंदिरा नगर परिसरात आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत होते.
- अविनाश यांच्या पत्नी डॉ. शुभांगी देशमुख हिचे आपल्या मामे भावासोबत अनैतिक संबंध होते.
- हे संबंध आपल्या पतीने स्वीकारण्यासाठी डॉक्टर पत्नी आणि तिची आई डॉ. अविनाश यांच्यावर दबाव टाकत होत्या.
- तसेच यावरुन त्यांचा मानसिक छळही करीत होत्या. याशिवाय सासू-सासऱ्यांसोबत रहायचे नाही, त्यामुळे वेगळे घर घे, असा तगादाही शुभांगी हिने पतीकडे लावला होता.
- या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. अविनाश देशमुख यांनी राहत्या घरातील बेडरुममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला दिली होती माहिती
- डॉ. अविनाश यांच्या आत्महत्येसमयी त्यांची पत्नी आपल्या माहेरी साताऱ्याला गेली होती.
- आत्महत्या करण्यापूर्वी अविनाश यांनी आपल्या पत्नीला याबाबत माहिती दिली.
- पत्नीने तिच्या आईला याबाबत सांगितले.
- आईने त्याच परिसरातच राहत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना कळविले.
- मात्र त्यांचे कुटुंबिय घरी पोहचण्याआधीच अविनाश यांनी आत्महत्या केली होती.
- याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी डॉक्टरच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पत्नी आणि सासू यांच्या विरोधात पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
- या दोघींनी मानसिक त्रास दिल्यानेच डॉ. अविनाश देशमुख यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
- डॉ. शुभांगी देशमुख आणि संगीता मोरे अशी आरोपींची नावे आहेत.
- या दोघींविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.