मुक्तपीठ टीम
घरी बसून शॉपिंग करणे, जेवणाची ऑर्डर देणे, वीज बिल भरणे, देशात किंवा परदेशात बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल करणे इत्यादी जवळपास सर्व कामे एका क्लिकवर होतात. एवढेच नाही तर आता पूर्वीप्रमाणे पैसे पाठवण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही कारण आता लोक काही मिनिटांत मोबाईलद्वारे ऑनलाइन पैसे पाठवतात. परंतू अनेक वेळा लोक चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवतात.’हे’ केल्यास चुकीच्या खात्यात पाठवले पैसे परत मिळवू शकता. चला तर मग परत पैसे कसे मिळवायचे ते जाणून घेवूया…
‘हे’ करा आणि चुकीच्या खात्यात पाठवले पैसे परत मिळवू…
- जर चुकून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत, तर बँक व्यवस्थापकाशी बोला.
- चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत हे त्यांना सांगा.
- चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे दाखवणारे सर्व पुरावे दाखवा.
- पैसे परत करण्यासाठी बँक त्या व्यक्तीला एक मेल पाठवते.
- त्यानंतर जेव्हा ती व्यक्ती परवानगी देते, तेव्हा बँक तुमचे पैसे तुम्हाला ७ दिवसांच्या आत परत करते.
- जर पैसे इतर बँक शाखेच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले असतील तर तुम्हाला तुमची समस्या त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगावी लागेल.
- समोरची व्यक्ती पैसे परत करण्यास नकार देत असेल, तर त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवा.
- जर ती व्यक्ती तुमचे पैसे परत करण्यास तयार असेल तेव्हा काही कागदपत्रांच्या प्रती जसे की आयडी आणि अॅड्रेस प्रूफ बँकेत जमा कराव्या लागतील.
- यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात.