Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच घडतो यशस्वी उद्योजक- पालकमंत्री छगन भुजबळ

येवला येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत बेरोजरागारांना फिरते विक्री केंद्रांसाठी वाहनांचे वाटप

November 14, 2021
in सरकारी बातम्या
0
chagan bhujbal ५

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून सावरण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना स्वत:च्या व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने अथक प्रयत्नातून फिरत्या विक्री केंद्रासाठी वाहन वाटपाचे हे उद्दिष्ट साकार झाले आहे. अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच यशस्वी उद्योजक घडत असतो, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

chagan bhujbal 1

येवला संपर्क कार्यालय येथे आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सौजन्याने बेरोजरागारांना फिरते विक्री केंद्राचे वाहन वाटप करण्यात आले त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक भगवान सुरसे, मुख्य प्रबंधक मनिष कुमार गुप्ता, शाखा प्रबंधक मोहम्मद साबिर,समन्वयक सचिन पवार आदी उपस्थित होते.

chagan bhujbal 2

यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ही योजना अमलात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा होईल यादृष्टीने नियमात बसवून योजना अमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून ६ लाख ते १० लाखांपर्यंत किंमतीचे मालवाहतुकीसाठी वाहन उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्याला वाहनाच्या किंमतीच्या ५ टक्के रक्कम सुरवातीला भरावी लागते. यावर शासनाची १५ टक्केपासून ३५ टक्केपर्यंत सबसिडी मिळते. व कर्जाच्या रकमेची ५ वर्षात परतफेड सुलभ हप्त्याने करता येते. या योजनेचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

 

याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात आनंदा दुनबळे, वेता बोथरा, पुजा जाधव, बळीराम जाधव, दत्तात्रय पगारे, सुरेश गोरडे, कुणाल वाकचौरे, योगेश वाघ, रोहिनी महानुभाव, काशिनाथ खळे, सविता लासुरे, निलेश वाकळे, सरला रोकडे, मेघाली खरात, राकेश जगताप व सायली जमादार या १६ लाभार्थ्यांना मालवाहतुक वाहनांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. तर २५ लाभार्थ्यांना वाहन मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले.


Tags: Bank of Maharashtrachagan BhujbalCM Employment Generation Schemeyeolaछगन भुजबळबँक ऑफ महाराष्ट्रमुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनायेवला
Previous Post

मुंबईत पेन्शनधारकांचे हाल! पेन्शन रजिस्टर आले नसल्यामुळे बँका शिक्षकांना परत पाठवतात!!

Next Post

वांद्रे रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणात फेरीवाल्यांची “लुडबूड” सुरुच

Next Post
Ashish shelar 5

वांद्रे रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणात फेरीवाल्यांची "लुडबूड" सुरुच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!