Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वांद्रे रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणात फेरीवाल्यांची “लुडबूड” सुरुच

भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी केली पाहणी

November 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar 5

मुक्तपीठ टीम

सुमारे १५२ वर्षे जुन्या वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागाचे सुशोभिकरण काम सुरु असतानाच पुन्हा फेरिवाल्यांनी स्थानकाला वेढा घातला असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी आज पालिका अधिऱ्यांसह पाहणी दौरा केला. याबाबत लवकरच पालिका, अधिकृत फेरिवाले, रिक्षा आणि रेल्वे याची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

Ashish shelar 1

वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्याचे आली आहे. वांद्रे स्थानक उपनगरीय मार्गावरील आकर्षक स्थानक असल्याने या स्थानकाला ‘उपनगरीय राणी’ असे संबोधले जाते. सुमारे १५२ वर्षांपेक्षा जुन्या हेरिटेज ए-वन दर्जा असलेल्या वांद्रे स्थानकाला नवीन साज देण्यात येत असतानाच रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील भागाचे सुशोभिकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक आमदार म्हणून भाजपा नेते अँड अशिष शेलार यांनी पाठपुरावा सुरु केला. रेल्वे, पालिका जागेच्या हद्दीचे वाद, फेरिवाल्यांनी घातलेला वेढा, त्यामुळे अपुरी जागा, त्याच ठिकाणी असलेला बस स्टाँप, रिक्षा स्टँड या सर्व विषयांवर मार्ग काढत या सुशोभिकरणाचा प्लँन तयार करण्यात आला. त्यासाठी अनधिकृत फेरिवाल्यांवर मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली ती लढाई न्यायालयापर्यंत गेली. त्यातून मार्ग काढून २०१९ ला कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

Ashish shelar 6

कोरोना काळात कामात शिथिलता येताच पुन्हा फेरिवाल्यांनी हळूहळू अतिक्रमण सुरु केले असून रिक्षा आणि बस यामुळे स्थानकातून बाहेर पडणे पुन्हा त्रासाचे झाले आहे. त्यातच रेल्वे आपल्या हद्दीत पादचारी पुलाचे काम करीत असून त्या कामातील भंगारचे गोडाऊन याच परिसरात बांधण्यात आले आहे. तर एकच मार्ग स्थानकात जाण्यास उपलब्ध ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने आज आमदार अँड आशिष शेलार यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त मसुरकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे याही उपस्थितीत होत्या.

Ashish shelar 3

दरम्यान प्राप्त परिस्थिती पाहिल्यानंतर परवानाधारक फेरिवाले, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, बेस्टचे अधिकारी आणि रेल्वे, महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत मार्ग काढण्याचे आज निश्चित करण्यात आले. तसेच सुशोभिकरणासाठी मोकळ्या केलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण केलेल्या अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करण्याचे निश्चित करुन कामाला वेग देण्याच्या सुचना आमदार अँड आशिष शेलार यांनी यावेळी केल्या.


Tags: adv. ashish shelarBandra Railway Stationअँड आशिष शेलारवांद्रे रेल्वे स्थानक
Previous Post

अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच घडतो यशस्वी उद्योजक- पालकमंत्री छगन भुजबळ

Next Post

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार

Next Post
Ajit pawar

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!