मुक्तपीठ टीम
टीव्हीएस कंपनीने TVS XL100 साठी किफायतशीर योजना सादर केली आहे. कंपनीच्या किफायतशीर मोबिलिटी सोल्यूशन्स सादर करण्याच्या प्रयत्नाशी बांधील राहत ग्राहक आता प्रतिदिन फक्त ४९ रूपयांमध्ये TVS XL100i-TOUCHstart व्हेरिएण्ट्स खरेदी करू शकतात. ३० दिवस प्रतिदिन ४९ रूपये या योजनेच्या माध्यमातून ग्राहक महिन्याला १,४७० रूपये इतका कमी ईएमआय भरू शकतील. यामध्ये दैनंदिन कलेक्शन किंवा रिपेमेण्टचा समावेश नाही. ग्राहकांना महिन्याला ईएमआय भरावा लागेल.
ग्राहकांना त्यांच्या रोजच्या प्रवासासाठी वैयक्तिक गतीशीलता सुविधा उपलब्ध करून देणे हा योजनेचा उद्देश आहे. कंपनी टीव्हीएस क्रेडिट सर्विसेस, श्रीराम फायनान्स, एलअॅण्डटी व आयडीएफसी फर्स्ट बँक अशा फायनान्सर्ससोबत सहयोग करत आहेत आणि या चारही वेगवेगळ्या कार्यकाळामध्ये त्याच ईएमआयचा लाभ घेता येऊ शकतो. TVS XL100 ने ग्राहकांसाठी अनुकूल अशा इतर योजना देखील सादर केल्या आहेत. त्यातील ‘बाय नाऊ पे लेटर’,’ ७,९९९ रूपयांपासून सुरू होणारा लो डाऊन पेमेण्ट’ आणि ७.९९ टक्क्यांपासून सुरू होणारा लो-इंटरेस्ट रेट’ या लोकप्रिय योजना आहेत.
TVS XL100चे फिचर्स
• TVS XL100 मध्ये १५ टक्के अधिक मायलेज देणारे इको थ्रस्ट फ्यूएल इंजेक्शन (ईटी-एफआय) तंत्रज्ञान आहे.
• सुलभ व शांतपणे गाडी स्टार्ट करणारी इंटीग्रेटेड स्टार्टर जनरेटर (आयएसजी) सिस्टिम आहे.
• या गाडीत ९९.७ सीसी फोर-स्ट्रोक इंजिन आहे, जे ६००० आरपीएममध्ये ३.२० किलोबॅट (४.३ बीएचपी) अधिकतम शक्ती आणि ३५०० आरपीएममध्ये ६.५ एनएम अधिकतम टॉर्क देते.
• सुलभ ऑन-ऑफ स्विच
• पर्यायी यूएसबी चार्जर
• आरामदायी राइड अनुभव अशी युजर-अनुकूल वैशिष्ट्ये.
TVS XL100 पाच व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे:
१. TVS XL100 Heavy Duty Kickstart
२. TVS XL100 Heavy Duty i-TOUCHstart
TVS XL100 Heavy Duty i-TOUCHstart Win Edition
३. TVS XL100 Comfort Kickstart
४. TVS XL100 Comfort i-TOUCHstart
५. नवीनच सादर करण्यात आलेली TVS XL100 Heavy Duty i-TOUCHstart Win Edition डिलाइट ब्ल्यू व बीव्हर ब्राऊन या आकर्षक रंगांमध्ये येते.
TVS XL100 ची किंमत 41,015 रूपयांपासून (एक्स-शोरूम महाराष्ट्र) सुरू होते.