Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपाच्या ८० हजार कोटींच्या ठेवी, नुसत्या व्याजाचेच १,६०० कोटी उत्पन्न!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
BMC FD

मुक्तपीठ टीम

कोरोना संकट हाताळणीमुळे देशभर कौतुकाचा विषय ठरलेली मुंबई मनपा आणखी एका कारणामुळे प्रशंसेस पात्र ठरणार आहे. एकीकडे देशभरातील बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिक गरजांसाठी राज्य सरकारवर अवलंबून राहतात. त्याचवेळी मुंबई मनपा मात्र आपल्या गरजा भागवून पुन्हा तब्बल ८० हजार कोटींच्या ठेवी बाळगून आहे. या ठेवी एफडी रुपात विविध सरकारी आणि खासगी बँकांमध्ये आहेत. तेवढंच नाही तर निव्वळ या ठेवींच्या बळावर मुंबई मनपाने १६०० कोटी रुपयांचे व्याज उत्पन्नही मिळवले आहे.

 

अतिरिक्त मनपा आयुक्त पी. वेलरासू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अर्थसंकल्पात, महापालिकेने मुंबई कोस्टल रोड सारख्या मेगा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा विकास निधीशी संलग्न ५०,९५२ कोटी रुपयांच्या एफडीमध्ये बदल केला आहे. कर्मचार्‍यांच्या प्रॉव्हीडन्ट फंड आणि पेन्शन खात्यात असलेल्या २६,२८३ कोटी रुपयांच्या एफडीचीही महापालिका संरक्षक आहे. मनपा एफडीवर वर्षाकाठी सुमारे १८०० कोटी व्याज मिळवते. मागील वर्षी व्याज कपातीमुळे ही रक्कम ७०० कोटी रुपयांनी कमी झाली होती, परंतु चालू आर्थिक वर्षात महापालिकेला सुमारे १६०० कोटी रुपये व्याज मिळाले आहे.

 

यावर्षी महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी ३९,०३८ कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले होते. साथीच्या काळात उत्पन्नातील घट असूनही, अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या, ३३,४४१ कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे १६.७ टक्के वाढ झाली आहे.

 

प्रशासनाने वाढता खर्च पूर्ण करण्यासाठी १०,५६४ कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज घेतले. त्यापैकी ५,८७६ कोटी रुपये दोन विभागांतर्गत ठेवलेल्या निधीतून कर्ज म्हणून उभे केले जाणार होते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३५०० कोटी रुपये हा उद्यान विकास निधीतून आहे, जो दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी आहे. तर २,३७६ कोटी रुपये भांडवलाच्या कामांसाठी वापरता येतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronamumbaiMunicipal Commissioner Iqbal Singh ChahalMy BMCआयुक्त इक्बाल चहलमनपा आयुक्त पी. वेलरासूमनपा एफडीमुंबईमुंबई कोस्टल रोड
Previous Post

कोल्हापुरात आगीपासून कागदपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी फायर बॉल

Next Post

दिवसाला फक्त ४९ रुपये दराने हप्ता, टीव्हीएस एक्स एल १००ची भन्नाट ऑफर

Next Post
TVS

दिवसाला फक्त ४९ रुपये दराने हप्ता, टीव्हीएस एक्स एल १००ची भन्नाट ऑफर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!