मुक्तपीठ टीम
नोएडामधील एका शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीवर स्वच्छतागृहात एका अज्ञात व्यक्तीने डिजिटल बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. गेल्या काही दिवसात असे अत्याचार घडण्याचे प्रमाण वाढल्याने त्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.
पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल!!
- पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले की, त्यांची चार वर्षांची मुलगी आहे.
- ती एका खासगी शाळेत शिकते.
- मुलगी शाळेत गेली असताना अज्ञात तरुणाने तिची पॅंट काढून तिच्या गुप्तांगांना नको तसा स्पर्श केला.
- घरी आल्यावर मुलीने आईला सांगितले की, तिच्या अंगाला खाज येत आहे.
- अशा स्थितीत आईने मुलीच्या अंगावर पावडर लावली.
- नंतर मुलीने सांगितले की, शाळेत तिच्यासोबत चुकीच्या गोष्टी घडल्या.
- त्यानंतर दोन दिवसांनी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांचा तपास सुरू!!
- एसीपी रजनीश वर्मा यांनी सांगितले की,७ आणि ८ सप्टेंबर रोजी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली आहे.
- ७ सप्टेंबरच्या फुटेजमध्ये मुलगी शाळेच्या स्वच्छतागृहात जाताना दिसत आहे.
- काही वेळाने ती बाहेर येते.
- यावेळी तिच्यासोबत कोणीही दिसले नाही.
- पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणीही केली आहे.
- वैद्यकीय तपासणीत बलात्काराची पुष्टी झाली नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.
- मात्र, याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
- तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील स्पष्ट अहवाल समोर आले.
डिजिटल बलात्कार म्हणजे नेमकं काय?
- डिजिटल बलात्कार म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मुलगी किंवा मुलाचे शोषण नाही.
- इंग्रजीमध्ये डिजिट म्हणजे अंक, तसेच बोट, अंगठा, पायाचे अंगठे यांसारख्या शरीराच्या अवयवांनाही डिजिट म्हणून संबोधले जाते.
- त्यामुळे जो लैंगिक छळ शरीराच्या बोटांसारख्या अवयवांनी केला जातो, त्याला डिजिटनं केलेला डिजिटल बलात्कार म्हणतात.
- निर्भया प्रकरणानंतर डिजिटल रेपमध्येही अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे.
- नोएडाच्या प्रकरणातील आरोपी चित्रकार पॉर्न दाखवत त्या मुलीच्या लैंगिक अवयवांशी बोटांनी घाणेरडे स्पर्श करत असे.
अगदी सोप्या भाषेत विषय आणि अर्थ सांगितला आहे तुम्ही. धन्यवाद.